द इंटिलिजेंट इन्व्हेस्टर : बेंजामिन ग्रॅहम

गुंतवणूक क्षेत्रातील धर्मग्रंथ म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो तो ग्रंथ म्हणजे द इंटिलिजेंट इन्व्हेस्टर. या पुस्तकाचे लेखक गुंतवणूक क्षेत्रातील पितामह म्हणूळ ओळखले जाणारे बेंजामिन ग्रॅहम हे होत. 1949 मध्ये प्रथम प्रकाशित झालेल्या बेंजामिन ग्रॅहम लिखीत ‘इंटेलिजंट इन्व्हेस्टर’ हे पुस्तक मूल्य गुंतवणूकीवर आधारित आहे. अलीकडेच 197172 मध्ये चौथी सुधारित आवृत्ती प्रकाशित केली होती आणि त्यात जगप्रसिध्द गुंतवणूकदार आणि ग्रॅहमचे विद्यार्थी वॉरेन बफे यांची प्रस्तावना आणि परिशिष्टांचा समावेश केला होता. जेसन  झ्वेइग यांनी चौथ्या आवृत्तीत भाष्य आणि नवीन तळटीप जोडली आणि ही नवीन आवृत्ती 2003 मध्ये प्रसिद्ध झाली.

   

सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस : बेंजामिन ग्रॅहम
‘सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस’ हे बेंजामिन ग्रॅहम आणि डेव्हिड डॉड यांनी लिहिलेले पुस्तक आहे. ‘सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस’ या पुस्तकाला गुंतवणूक क्षेत्रातील महत्वाचा संदर्भ ग्रंथ म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे. वॉल स्ट्रीटवर झालेली प्रचंड मोठी पडझड आणि ग्रेट डिप्रेशनच्या काही काळानंतर 1934 मध्ये  ‘सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस’ची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ग्रॅहम आणि डोड यांनी सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस पुस्तकामध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी यासारख्या संकल्पनांचा वापर केला आहे. एखाद्या कंपनीच्या अचूक विश्लेषणानंतर त्यामध्ये केलेली गुंतवणूक ही आपली गुंतवणूक तर सुरक्षित ठेवतेच पण त्यातून पुरेसा परताव्याचीही खात्री देते असा वेगळा दृष्टिकोन गुंतवणूकदारांना दिला.  

   

लिटिल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग : जॉन बोगल
वॅनगार्ड समूहाचे संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन सी. बोगल यांनी ‘लिटिल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग’ हे पुस्तक लिहीले.  स्टॉक मार्केटमधून चांगले रिटर्न्स मिळवण्यासाठी  योग्य शेअर व चांगल्या परताव्याची हमी मिळवण्यासाठी 2007 आणि 2017 मध्ये हे पुस्तक खूप उपयोगी ठरले. या पुस्तकाच्या माध्यमातून बोगल यांनी स्पष्ट केले की, शेअर मार्केटमधून चांगला परतावा मिळवायचा असेल तर एखादनया वैयक्‍तीक शेअरमध्ये गुंतवणूक करण्याएवजी निर्देशांक फंडावर लक्ष केंद्रित करावे.  ज्यामुळे गुंतवणूकदाराला सरासरी बाजारातील एकूण उलाढालीच्या तुलनेत चांगला परतावा मिळेल आणि गुंतवणूकीचा खर्च कमी आणि जोखीमही अन्य गुंतवणूक मार्गांच्या तुलनेत कमी राहिल. 

   

द वॉरन बफे वे - वॉरन बफे
द वॉरन बफे वे म्हणजे जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदार वॉरन बफे यांचे जणू आत्मचरित्रच. या पुस्तकात बफे यांच्या गुंतवणुक आयुष्याचा संपूर्ण लेखा-जोखा मांडलेला आहे. गुंतवणूक करताना त्यांनी वापरलेल्या ट्रीक्स, त्यातून त्यांना कधी फायदा तर कधी तोटा कसा झाला याचे सुंदर वर्णन केले आहे. त्यांच्या या अनुभव कथनातून इतर गुंतवणूकदांना बर्याच गोष्टी शिकण्यास मिळतात व त्याचा उपयोग यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी नक्कीच होतो. या पुस्तकात बफे यांच्या गुंतवणूकशास्त्राबरोबर वैयक्तिक व उद्योजक आयुष्याचा खोलवर उलगडा होतो. या पुस्तकामुळे वाचकाची गुंतवणूकीकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते.

   

वन अप ऑन वॉल स्ट्रीट - पीटर लिन्च
प्रख्यात म्युच्यूअल फन्ड मॅनेजर पीटर लिन्च यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक यशस्वी बणू पाहणार्या गुंतवणुकदारांसाठी खूप उपयुक्त आहे. इन्वेस्टमेंट संबंधित आपल्याकडे असणारे ज्ञान हेच आपल्याला यशाकडे घेऊन जाऊ शकते त्यासाठी गरज आहे ती फक्त त्यास आणखी सक्षम करण्याची. तो सक्षमपणाच कसा आणायचा हे पीटर यांनी या पुस्तकात सांगितले आहे. हे पुस्तक म्हणजे गुंतवणुकीसंबंधी ज्ञानाचे भांडर असून वाचकांच्या प्रचंड पसंतीस उतरलेले आहे. हे गुंतवणुकीसंबंधीत पुस्तकांमध्ये बेस्ट सेलर बुक आहे. या पुस्तकामध्ये मार्केटमधील चढ-उतारांचा सामना करून पैसे कसे बणवायचे याच्या उपयुक्त टीप्स पीटर यांनी दिलेल्या आहेत.

   

कॉमन स्टॉक्स एन्ड अनकॉमन प्रॉफीट्स - फिलीप फीशर
1958 साली प्रकाशित झालेले कॉमन स्टॉक्स एन्ड अनकॉमन प्रॉफीट्स हे पुस्तक गुंतवणुकदारांसाठी ज्ञान मिळवण्याचा एक फार महत्त्वाचा आधार बनला. या पुस्तकाचे लेखक फिलीप फीशर हे एक जगातील यशस्वी व प्रभावी गुंतवणूकदार आहेत. गुंतवणुकीसाठी शेअर निवडण्याचा जो काही गोंधळ असतो तो या पुस्तकाद्वारे लेखकाने दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात मांडलेले सिध्दांत हे फक्त गुंतवणूकदारांसाठीच नव्हे तर अडचणीत असणार्या कंपन्यांसाठीसुध्दा उपयुक्त ठरताता. कुठल्या कंपनीचा शेअर केव्हा खरेदी व विक्री करायचा याचे शास्त्र फिशर यांनी मांडले आहे.

   

लर्न टू अर्न - पीटर लिन्च, जॉन रोथचील्ड
शेअर मार्केटमधील नवखे गुंतवणूकदार किंवा उद्योजक यांच्यासाठी हे पुस्तक फार दिशादर्शक आहे. लेखक पीटर लिन्च व जॉन रोथचील्ड या पुस्तकाद्वारे वाचक, गुंतवणूकदार किंवा उद्योजक यांना सांगतात की, श्रीमंत आणखी श्रीमंत तर गरीब आणखी गरीब होत असतो यात काही तथ्य नाही. कारण मार्केटमधील चढ-उतार या संकल्पनेला फार काळ टीकू देत नाही. ते म्हणतात की, बाजारातील वस्तू विकत घेऊन त्यांचा फक्त वापर करण्यापेक्षा त्यापासून मी पैसे कसे कमवू शकतो याचा सर्वांनी विचार केला पाहिजे तर एक मोठा उद्योग किंवा उद्योगपती निर्माण होतो. हे पुस्तक यशस्वी होऊ पाहणार्या गुंतवणूकदार किंवा उद्याजकांसाठी मैलाचे दगड निर्माण करतंच शिवाय त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचं मार्गदर्शनही करतं.