सर रिचर्ड ब्रॅन्सन : अपयशाला प्रेरणास्रोत मानणारा उद्योजक  

सर रिचर्ड ब्रॅन्सन : अपयशाला प्रेरणास्रोत मानणारा उद्योजक  

व्हर्जिन ग्रुपचे संस्थापक आणि जगातील प्रख्यात बिझनेसमन एवढीच सर रिचर्ड ब्रन्सन यांची ओळख मर्यादीत नाही. यश मिळविण्यासाठी अपयश गरजेचे असते आणि आपली कमजोरी हीच आपल्या यशासाठी कशी ताकद बनते या थिअरीचे ते उद्गाते आहेत. व्हर्जिन ग्रुपसारखे मोठे साम्राज्य उभे करणाऱ्या ब्रॅन्सन यांचा जीवनप्रवास विलक्षण आहे. 

१८ जुलै १९५० रोजी इंग्लंडमधील सरे येथे जन्मलेले रिचर्ड ब्रॅन्सन सांगतात... शाळेच्या दिवसात मी खूप कमकुवत होतो. शाळेतील माझे सहकारी विद्यार्थी आणि शिक्षकही मला मुर्ख समजायचे. मग मी आपल्यामध्ये कोणते कौशल्य नाही का ? याचा मी शोध घेतला. मला आढळलं की मी खूप उत्साही आहे. मग त्याच गोष्टीला मी माझा मार्ग बनवलं आणि आज या यशोशिखरावर पोहोचलो आहे. मी शाळेत खूप कमकुवत मनाचा विद्यार्थी होतो. पण मला त्याचवेळी हे पक्कं ठाऊक झालं की माझ्यासारखा उत्साही कोणीही असणार नाही. मी स्वतःवर विश्वास ठेवला आणि व्हर्जिन कंपनी उभारली असे ते सांगतात. 

त्यांचे वडील एडवर्ड जेम्स ब्रॅन्सन यांनी बॅरिस्टर म्हणून काम केले. त्याची आई, हव्वा ब्रॅन्सन फ्लाइट अटेंडंट म्हणून कामावर होती. रिचर्ड सांगतात... तुम्ही प्रयत्न केले, आव्हानांना तोंड दिले तर तुम्ही कधीही थकत नाही. एकतर तुम्ही जिंकता अथवा नवे काही तरी शिकता. माझ्या आयुष्यातील प्रवासात मी या ठिकाणी पोहोचेन असे कधी वाटले नव्हते. मला सर्वजण मुर्ख समजायचे. मला डिसलेक्सिया आजार होता. या आजाराने त्रस्त असलेली मुले शिकण्यावर आपले लक्ष केंद्रीत करू शकत नाहीत. त्यामुळे अडचणी खूप यायच्या. पण ही कमजोरीच माझी ताकद बनली. मला समजलं की डिसलेक्सिया आजाराने त्रस्त असलेले लोक त्या कामांत खूप चांगले असतात, ज्यामध्ये त्यांना उत्साह वाटतो आणि ज्या गोष्टींबाबत त्यांना प्रेम असते. ही गोष्ट पडताळण्याचे मी ठरवले. वयाच्या १५ व्या वर्षी मी शाळा सोडली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी युवा-संस्कृती मासिक (मॅक्सिन) सुरू केले. त्याचील माहिती आणि त्यासंबंधीचे रेकॉर्ड ऑनलाइन अपडेट करण्याचा प्रयत्न केला. पण, अपयश पदरी आले. या अपयशाने त्यांना यशाचा रस्ता दाखवला. त्यांनी ऑनलाइन बिझनेसचे तंत्र सापडले. इथेच व्हर्जिन ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली गेली. अनेकांनी त्यांच्यासोबत बिझनेस करण्यास असमर्थता दाखवली. पण, त्यांनी हिंम्मत सोडली नाही. 

१९७०च्या दशकात त्यांनी व्हर्जिन रेकॉर्ड्सला सुरुवात केली. यादरम्यान, व्यावसायिक शिक्षणासाठी  त्यांनी १९७२ मध्ये इंग्लंडच्या ऑक्सफोर्डशायरमध्ये रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार करण्याचे काम केले. मग त्यांचा व्यवसाय देशापुरता मर्यादीत राहीला नाही. बहुराष्ट्रीय स्तरावर संगीत क्षेत्रासह स्पेस-टुरिझम, व्हर्जिन गॅलॅटिक्ससह इतर क्षेत्रात व्यवसाय विस्तारला. आणि त्यातून रिचर्ड अब्जाधिश बनले. ब्रान्सन लंडनच्या कम्युनिटीमध्ये राहत होता, त्याभोवती ब्रिटीश संगीत आणि ड्रग सीन होते. त्याआधी ब्रॅन्सनने लंडनमधील ऑक्सफोर्ड स्ट्रीटमध्ये विक्रमी दुकानात एका कंपनीचे काम केले. या वेळी ब्रॅन्सनने आपल्या मासिकासाठी व्हर्जिन नावाची मेल-ऑर्डर रेकॉर्ड कंपनी सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. व्हर्जिन ग्रुप जगातील ३५ देशांमध्ये पोहोचला. सुमारे ७० हजार कर्मचारी युनायटेड किंगडम, अमेरिका, कॅनडा, आशिया, युरोप, दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्ये व्हर्जिन ग्रुपचे काम सांभाळत आहेत. ट्रेन कंपनी, लक्झरी गेम प्रेझर्व्ह, मोबाइल फोन कंपनी आणि व्हर्जिन गॅलॅक्टिक अशा अंतराळ पर्यटनापर्यंतच्या क्षेत्रापर्यंत त्यांनी कंपनीचा विस्तार केला. ब्रॅन्सन त्यांच्या धाडसी कामगिरीबद्दल ओळखले जातात. व्हर्जिन अटलांटिक चॅलेंजर म्हणून त्यांनी हॉट एअर बलूनमधून अॅटलांटिक क्रॉसिंग केले. 

१९७२ मध्ये ब्रॅन्सन यांनी लेबल व्हर्जिन रेकॉर्ड लाँच केली. याचा पहिला अल्बन ट्यूबलर बेल्स व्हर्जिन रेकॉर्ड्ससाठी तयार केला होता. हा अल्बम बेस्ट सेलर्स बनला. त्यानंतर व्हर्जिन रेकॉर्डसने संस्कृती क्लबमध्ये संगीताच्या दुनियेतही सादर केले. १९७९ पर्यंत व्हर्जिन ग्रुपच्या माध्यमातून ब्रॅन्सन यांची संपत्ती ५ मिलिनय युरोची बनली. एकदा ब्रॅन्सन विमान प्रवास करीत होते. अचानक त्यांचे विमान रद्द झाले. इथेच त्यांनी स्वतःच्या विमान कंपनीचा विचार केला. आणि १९८२ मध्ये नाइट क्लब हेवन खरेदी केला. 

ब्रॅन्सन यांनी १९८४ मध्ये व्हर्जिन अॅटलांटिक एअरवेज आणि व्हर्जिन कार्गोची स्थापना केली. १९९२ मध्ये आपल्या एअरलाइन्स कंपनीला टिकवण्यासाठी ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन लेबलचा व्यवसाय ५०० मिलियन युरोला विकला . व्हर्जिन ग्रुपने युरो बेल्जियम एअरलाइन्सचे अधिग्रहण केले. नंतर त्याचे नाव व्हर्जिन एक्स्प्रेस ठेवण्यात आले. १९९९ मध्ये व्हर्जिन ग्रुपने मोबाइल आणि सन २००० मध्ये एअरलाइन्स व्हर्जिन ब्लू या दोन्ही बाबी लाँच केल्या. नंतर २००६ मधअये ब्रॅन्सन यांनी व्हर्जिन मोबाइल कंपनी १ बिलियन डॉलरला विकली. त्यानंतर त्यांनी २००७ मध्ये व्हर्जिन मीडियाचे लाँचिंग केले. २००८ मध्ये व्हर्जिन समुहाने भारतात मोबाइलचे लाँचिंग केले होते. त्यांनी अनेक कंपन्यांचे अधिग्रहण केले. सद्यस्थितीत ४०० हून अधिक कंपन्यांचे नियंत्रण व्हर्जिन समुहाकडे आहे. 

रिचर्ड ब्रॅन्सन यांनी खेळामध्ये अनेक विक्रम बनवले. जुलै २००७ मध्ये त्यांनी नूसा येथे मेकसीप बेट खरेदी केले. आपल्या यशाच्या कारकिर्दीत ब्रॅन्सन यांनी अनेक सन्मान मिळवले. २००६ मध्ये त्यांचा संडे टाइम्सच्या यादीत यूकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये नवव्या स्थानावर समावेश होता. १९९३ मध्ये ब्रॅन्सन यांना डॉक्टर ऑफ टेक्नॉलॉजी या पदवीने सन्मानीत करण्यात आले. १९९९ मध्ये ब्रॅन्सन यांना व्यापार जगतातील सेवेसाठी नाइट बॅचलर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २००० मध्ये विमान सेवेतील योगदानाबद्दल त्यांना टोनी जुन्नस पुरस्कार मिळाला. २००७ मध्ये टाइम मॅगझिनने जगातील सर्वात प्रभावशाली १०० लोकांमध्ये त्यांचा समावेश केला. २०११ मध्ये ब्रॅन्सन यांना जर्मन मीडिया पुरस्कार देणअयात आला. तर नॉर्वेमध्ये २०१४ मध्ये त्यांना बिझनेस फॉर पीस अॅवार्ड देण्यात आले. २०१५ मध्ये बॅन्सन यांना ब्रिटनची कंपनी रिचटॉपीयाकडून प्रभावशाली ब्रिटिश उद्योगपतींच्या यादीत पहिल्या क्रमांकाचे स्थान देण्यात आले. 

रिचर्ड यांना त्यांच्या मौलिक विचारांबद्दलही ओळखले जाते. ते चांगले लेखक आहेत. त्यांच्या मते एखाद्या व्यवसायाचा उद्देश केवळ दुसऱ्या लोकांच्या जीवनाला चांगले बनविण्याचा असू शकतो. व्यवसाय निर्माण करणे म्हणजे रॉकेट सायन्स नाही. तर हा एक महान विचार आहे की जो पूर्णपणे प्रामाणिकपणे अखेरपर्यंत केला जाऊ शकतो. 

एक चांगला नेता कधी आपल्या डेस्कमागे लपत नाही असे रिचर्ड यांचे धाडसी विधान आहे. 

तुम्ही लोकांना चांगल्या पद्धतीने प्रशिक्षण द्या, ज्यातून ते सर्वकाही शिकू शकतील आणि तुमची नोकरी सोडू जाऊ शकतील. पण, तुम्ही त्यांच्याशी असे वागा की ते कधीच जाऊ इच्छिणार नाहीत असा मूलमंत्र रिचर्ड यांनी दिला आहे. आपल्या अपयशापासून शिका. जर तुम्हाला यशस्वी उद्योगपती व्हायचे असेल आणि तुमचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला नाही, तर तुमचे या क्लबमध्ये स्वागत आहे असेही रिचर्ड आपल्या मौलिक विचारांमध्ये सांगतात. माणसांची नियुक्ती करणे ही एक कला आहे आणि प्रत्येक उद्योजकाने त्यात मास्टर असले पाहिजे असे त्यांचे मत आहे. जितके तुम्ही सक्रिय काम कराल, व्यावहारिक राहाल, तेवढे तुम्ही स्वतःला यशस्वी समजाल अशी सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सफलतेची परिभाषा आहे. 

News-In-Focus