आठवड्यात येणार 5 आयपीओ, गुंतवणूक करून कमवा पैसे 

आठवड्यात येणार 5 आयपीओ, गुंतवणूक करून कमवा पैसे 

यपीओमध्ये गुंतवणूक करू इच्छिणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. या आठवड्यात 5 कंपन्या आयपीओ लाँच करणार आहेत. त्यांच्याकडून एकूण 3,764 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. भारतीय शेअर मार्केटमध्ये सध्या असलेल्या चांगली तरलता आणि नव्या गुंतवणूकदारांची संख्या याचा फायदा घेण्याचा प्रयत्न या कंपन्यांचा आहे. जाणून घेऊ काय आहे गुंतवणूकीची संधी.

क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन  आणि लक्ष्मी ऑर्गेनिक्स इंडस्ट्रीजचा आयपीओ सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी खुला होणार आहे. तर कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ मंगळवारी लाँच होईल. याशिवाय सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि नजारा टेक्नॉलॉजीज यांचा आयपीओ बुधवारी येणार आहे. या कंपन्यांचे शेअर्स बीएसई आणि एनएसईमध्ये लिस्ट केले जातील. 

क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन 

वाहनांचे पार्ट्स बनविणारी क्राफ्ट्समॅन ऑटोमेशन कंपनी आयपीओमधून 824 कोटी रुपये उभारणार आहे. यामध्ये 150 कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. याशिवाय, प्रमोटर्स आणि सध्याच्या शेअरधारकांकडून 45,21,450 शेअर्सची विक्री ऑफर फॉर सेल अंतर्गत होईल. आयपीओसाठी 1,488-1,490 रुपये प्रति शेअर प्राइस बँड असून  आयपीओ 15 मार्च रोजी खुला होईल. तर 17 मार्च रोजी बंद होईल. 

लक्ष्मी ऑर्गेनिक्स 

कंपनी या आयपीओमधून 300 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी करेल. याशिवाय प्रमोटर यलो स्टोन ट्रस्टकडून 300 कोटी रुपये शेअर्स ऑफर फॉर सेलअंतर्गत विक्री केले जातील. आयपीओसाठी प्राइस बँड 129-130 रुपये प्रति शेअर आहे. हा आयपीओसुद्धा 15 मार्च रोजी खुला होऊन 17 मार्च रोजी बंद होणार आहे. 

कल्याण ज्वेलर्स 

बहुप्रतिक्षित कल्याण ज्वेलर्सचा आयपीओ 1,175 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये 800 कोटी रुपयांचे नवे शेअर जारी केले जातील. याशिवाय 375 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्री केले जाणार आहेत. या आयपीओसाठी 86-87 रुपये प्रति शेअर प्राइस बँड आहे. हा आयपीओ 18 मार्च रोजी बंद होईल. 

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ 17 मार्च रोजी खुला होणार आहे. आयपीओअंतर्गत नव्याने 81,50,000 इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय विद्यमान शेअर धारकांकडून 1,09,43,070 इक्विटी शेअर्सची विक्री केली जाईल. आयपीओसाठी 303-305 रुपये प्रति शेअर प्राइस बँड ाहे. हा आयपीओ 19 मार्च रोजी बंद होणार आहे. कंपनीच्या उच्च स्तरावरील प्राइस बँडनुसार बाजारातून 582 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. 

नजारा टेक्नोलॉजीज

नजारा टेक्नोलॉजीजचा आयपीओ 583 कोटी रुपयांचा असेल. या अंतर्गत कंपनीचे प्रमोटर्स आणि सध्याचे शेअरधारक 52,94,392 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी ठेवतील. या आयपीओचा प्राइस बँड 1,100-1,101 रुपये प्रति शेअर आहे. हा आयपीओ 17 मार्च रोजी खुला होणार असून 19 मार्च रोजी बंद होईल.

News-In-Focus