यंदा आयपीओचा वाणवा... वर्षभरात फक्त 11 आयपीओ दाखल

यंदा आयपीओचा वाणवा... वर्षभरात फक्त 11 आयपीओ दाखल
     2019 वर्ष संपण्यास फक्त तीनच महिने राहिले आहेत आणि आतापर्यंत फक्त 11 नविन कंपन्यांचे कॅपीटल मार्केटमध्ये पदार्पण झाले आहे. हे वर्ष आयपीओसाठी फार कोरडे गेल्याचे दिसून येते. यावर्षी कॅपीटल मार्केटमध्ये आयपीओद्वारे 10,000 करोड रुपये उभे झाले जे मागील दोन वर्षांच्या मानाने खूप कमी आहे. 2018ला आयपीओद्वारे 30,959 करोड रुपये उभे झाले होते. 2018ला आयपीओद्वारे एकूण 24 कंपन्यांनी कॅपीटल मार्केटमध्ये पदार्पण केले पण यावर्षी तो आकडा अर्ध्यावर गेला. यावर्षी फक्त 11 कंपन्यांचेच आयपीओ आले. तर 2017 साली 36 कंपन्यांचे आयपीओ आले त्यातून 68,000 करोड रुपये कॅपीटल मार्केटमध्ये उभे राहिले. गेल्या तीन वर्षांत येणार्या आयपीओचे प्रमाण घसरत चाललेले यावरून दिसते. 

     ग्लोबल व डोमेस्टिक मार्केटमध्ये होणार्या घडामोडीमुळे या वर्षी शेअर बाजारात खूप चढउतार दिसून आला. यामुळे आयपीओसाठी हे वर्ष फार कठीण गेले व येणारे तीन महिनेही सोपे नाही. युएस-चायना ट्रेड वॉर तसेच देशातील आर्थिक मंदीचे सावट याचाही धसका आयपीओने घेतलेला जाणवतो. 

 

     सिक्युरीटीज अॅन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अधिकृत आकडेवारीनुसार यावर्षी 90 कंपन्यांनी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरींग प्रॉस्पेक्टस (डीआरएचएफ) दाखल केले होते. त्यापैकी थोड्याच कंपन्या आयपीओपर्यंत पोहोचल्याचे लक्षात येते. यावर्षी जे 11 आयीपओमध्ये पॉलीकॅब इंडिया, मेट्रोपोलीस हेल्थकेअर, रेल विकास निगम, शॅलेट हॉटेल, एफल इंडिया, स्पंदना स्फूर्ती फायनान्शीयल, स्टर्लिंग अॅन्ड विल्सन या मुख्या कंपन्यांचा समावेश आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेअर बाजारात दबावाचे वातावरण असले तरी बहुतांश कंपन्यांची लिस्टींग ही इश्यू प्राईसच्या वरच झालेली आहे. 

     सेबीच्या नियमानुसार आयपीओचे अॅप्रुवल मिळाल्यावर कंपनीला एक वर्षाच्या आत आयपीओ आणणे बंधनकारक आहे. अस करण्यास जर कंपनी अपयशी ठरली तर तीला पुन्हा डीएचआरएफ सेबीकडे दाखल करावा लागतो. आयपीओमधून जो फंड उभा राहतो त्याचा वापर कंपनी बिजनेस एक्स्पांशन, लोन कमी करणे यासाठी करते. याशिवाय प्रमोटर्ससुध्दा हे भांडवल वापरतात.

- Rajhans Tripathi
contacts@thestock.in
18/09/2019

News-In-Focus