"मार्केट मास्टर"... विजय केडीया

"मार्केट मास्टर"... विजय केडीया

    शेअर मार्केटमध्ये करीअर करून यशस्वी गुंतवणूकदार होणार्यांसाठी भारतीय शेअर मार्केटमधील यशस्वी गुंतवणूकदार डॉ. विजय किशनलाल केडीया यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांची कंपनी केडीया सिक्युरीटीजची अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे. बर्याच कंपन्यांचे ते प्रमोटर, डायरेक्टरसुध्दा आहेत. केडीया बजनेस व शेअर मार्केटसंबंधी सतत वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्याणे देत असतात. त्यापैकी अहमदाबाद व बंगळुरू येथील आयआयएमचे ते मुख्य वक्ता आहेत. याशिवाय लंडन येथील बिजनेस स्कूलमध्येही त्यांचे व्याख्याण झाले आहे. केडीया यांना मार्केट मास्टर म्हणून ओळखले जाते.

    केडीया यांचा जन्म शेअर मार्केटचे ब्रोकर असलेल्या मारवाडी कुटूंबात झाला असल्याने वयाच्या 14व्या वर्षीपासून शेअर मार्केटबाबत आकर्षण होते व नंतर त्यांनी 19 व्या वर्षी शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. शेअर मार्केट त्यांचं पॅशन होतंच पण वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांना बिजनेसमध्ये लक्ष घालणे बंधनकारक झाले. तिन वर्ष बिजनेसमध्ये लक्ष घातल्यानंतर त्यांनी शेअर मार्केटमध्ये स्वत ट्रेडींग करण्यास सुरूवात केली. त्यात ते प्रचंड अपयशी झाले त्यांना खूप नुकसान सोसावे लागले. सतत दहा वर्षे त्यांना मार्केटमध्ये संघर्ष करावा लागला. ट्रेडींग करीत असताना ते बर्याचदा मिळविलेले पैसे गमावून बसायचे. त्यामुळे ते निराश झाले व त्यांनी चहा सप्लायचा बिजनेस सुरू केला. 

    बिजनेस करीत असताना शेअर मार्केटचे भूत काही त्यांचा पिच्छा सोडत नव्हते. त्यांनी शेअर मार्केट व बिजनेससंबंधी जगातील यशस्वी लोकांच्या पुस्तकांचे वाचन सुरू केले. यामधून त्यांना जाणीव झाली की शेअर मार्केटमध्ये जर यश मिळवायचे असेल तर ट्रेडींग सोडून आपणास नियोजनबध्द इन्वेस्टमेंट करावी लागेल. मग पुन्हा शेअर मार्केटमध्ये नशिब आजमविण्यासाठी त्यांनी 2004 साली मुंबई गाठली. तेथे एकटेच रेन्टवर घर घेऊन राहू लागले. लिस्टेड कंपन्यांची माहिती घेऊ लागले फंडामेंटल एनालिसीसवर जोर दिला. त्यावेळी त्यांच्याकडे इन्वेस्टमेंटसाठी फक्त रुपये 35 हजार शिल्लक होते. कंपन्यांचा अभ्यास करीत असताना त्यांना पंजाब ट्रॅक्टरबाबत आशा वाटली. त्यावेळी त्यांनी होते तेवढे रुपये 35 हजार पंजाब ट्रॅक्टरमध्ये गुंतविले. तिन वर्षांनंतर पंजाब ट्रॅक्टरच्या शेअरची किंमत 6 पट वधारली त्यांच्या रुपये 35 हजाराचे रुपये 2 लाख 10 हजार झाले. त्यानंतर त्यांनी लगेच त्या सर्व पैशांमध्ये एसीएसीसीचे रुपये 300 प्रमाणे शेअर घेतले. वर्षभर एसीसीचा शेअर काही पुढे जाईना तरी त्यांनी गुंतवणूकीला हात लावला नाही. पण पुढच्याच वर्षी एसीसीच्या शेअरने जम्प घेतली व थोडा-थोडका नव्हे तर तो 10 पट वाढला. त्यांनी त्यांच्याकडील सर्व शेअर विकून पैसे हातात घेतले. आता त्यांना रेन्टच्या घरात राहण्याची गरज नव्हती कारण मुंबईमध्ये एक अपार्टमेंट विकत घेता येईल एवढे पैसे त्यांच्याकडे आले होते आणि त्यांनी तसे केलेही. 

    मुंबईमध्ये अपार्टमेंट विकत घेतल्यानंतर शेअर मार्केटमध्ये त्यांची यशाची घौडदौड चालूच राहीली. त्यानंतर त्यांनी अभ्यास करून अतुल ऑटो, एजीस लॉजीस्टिक्स, सेरा सॅनिटरीवेअर या कंपन्या निवडल्या व त्यामध्ये गुंतवणूक केली. पुढील 10-12 वर्षांत या कंपन्यांच्या शेअरच्या किंमती 100 पटीने वाढल्या. 2016 ला विजय केडीया यांची "बिजनेस वर्ल्ड"च्या "इंडीयन सक्सेसफूल इन्वेस्टर्स"मध्ये 13 व्या स्थानी नोंद झाली. 2017 साली केडीया यांचा पोर्टफोलिओ 107 टक्के वाढला होता. त्याचवेळी म्हणजे 2018 साली त्यांना लंडनच्या बिजनेस स्कूलमधून व्याख्यान देण्यासाठी आमंत्रण आले. 

    गुंतवणुकीसाठी जर आपणास चांगल्या कंपन्या निवडायच्या असतील तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी वाचन हेच एकमेव साधन आहे. वाचनच तुम्हाला यशस्वी गुंतवणूकदार बनण्याकडे घेऊन जाते. शेअर मार्केटमध्ये पैसे गमविण्याच्या भितीने बरीच लोक गुंतवणुकीपासून दूर राहतात कारण त्यांच्याकडे संयम नसतो. शेअर मार्केटमध्ये फायदा मिळवायचा असेल तर संयम फार गरजेचा आहे. एखाद्या स्टॉकची किंमत वाढायला वेळ लागतो आणि तो वेळ त्याला देणे आवश्यक आहे, असा सल्ला नविन गुंतवणुकदारांना केडीया देतात.

    ते त्यांच्या अनुभवातून आणखी सांगू इच्छितात की, शेअर मार्केट ह्या एकाच कमाईच्या सोर्सवर जगू नका. याच्याबरोबर एक किंवा अनेक समांतर कमाईचे सोर्सेस चालू ठेवा. ही सोर्सेस तुम्हाल मार्केटच्या घसरणीमध्ये सावरतील. शेअर मार्केट हा काही सट्टा नव्हे तर त्याच्याकडे बिजनेस म्हणून बघा. कुठलाही स्टॉक फक्त फंडामेंटल स्टडीच्या आधारावर घेऊ नका तर त्या कंपनीच्या न्यूज, डेवलपमेंटवरसुध्दा लक्ष ठेवा तरच तुम्हाला यश मिळेल व तुम्ही यशस्वी गुंतवणूकदार व्हाल.
(Published On 11/04/2020)

News-In-Focus