उद्योगजगताचा दीपस्तंभ... रतन टाटा

उद्योगजगताचा दीपस्तंभ... रतन टाटा

    देशावर आलेले एखादे संकट असेल, मग ती मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असेल अथवा करोना व्हायरसच्या संसर्गाचे संकट. वयाच्या ८३ व्या वर्षीही टाटा उद्योग समुहाचे प्रमुख, रतन टाटा ठामपणे देशासोबत उभे रााहिलेले दिसतात. असे म्हणले जाते की सर्वसामांन्य माणसांना तुमच्याविषयी आदर, अपार प्रेम वाटणे ही असामान्यत्वाची ओळख असते. हा विश्वास रतन टाटा यांनी कमावला आहे. ११० कंपन्यांचा जगभरात विस्तार असलेल्या टाटा ग्रुप ऑफ इंडियाचे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळताना त्यांनी या उद्योग समुहाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आपल्या कंपन्यांना, नफा मिळवून देणाऱ्या गुंतवणुकदारांचेच नव्हे तर सामान्य कर्मचाऱ्यांचे हित त्यांनी नेहमी डोळ्यांपुढे ठेवले. सचोटी आणि तर्कशुद्ध कृती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये उद्योग जगताला नेहमीच आकर्षित करतात. समोर उभ्या ठाकलेल्या समस्यांची हाताळणी करताना त्यांच्यातील लढाऊ बाणा समोर येतो. सर्वसामान्यांविषयीची आत्मियता, देशाविषयीची निष्ठा यामुळे रतन टाटा प्रत्येकाचे आयडॉल आहेत.

    सूरतमध्ये २८ डिसेंबर १९३७ ला जन्मलेले रतन टाटा तसे मुंबईकरच. वडील नवल आणि आई सोनू यांनी त्यांना घडवले. जेआरडी टाटांचे पुतणे असलेल्या रतन टाटांनी कोनरेल युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले. एक उद्योगपती आणि गुंतवणूकदार म्हणून आयुष्यभर वावरलेले रतन टाटा  १९८१ मध्ये टाटा ग्रुप आणि ग्रुपचे अध्यक्ष झाले. भारत सरकारने पदमभूषण पदवीने त्यांचा सन्मान केला आहे. भारतातील सर्वात स्वस्त कारची निर्मिती हे स्वप्न बाळगलेल्या रतन टाटांनी नॅनो कारची निर्मितीही केली. टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टंट्स, टाटा पॉवर आणि टाटा टेलिसर्व्हिसेस अशा सर्व कंपन्यांचे त्यांनी अध्यक्ष म्हणून  काम पाहिले आहे. त्यांच्या काळात या समूहाने अनेक उंची गाठल्या आणि उत्पन्नातही अनेक पटींनी वाढ झाली. सध्या ते टाटा समूहाच्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत.

    जमशेदजी टाटांनी स्थापन केलेल्या उद्योगसमुहाचा विस्तार पुढील पिढ्यांनी केला. टाटा समूहात ११० कंपन्या आहेत. त्यामध्ये टाटा चहापासून पंचतारांकित हॉटेल्स, सुयांपासून स्टील आणि लाखाच्या नॅनोपासून ते विमानापर्यंत सर्व काही बनवतात. या समुहात १९६१ मध्ये त्यांची कारकीर्द सुरू झाली. रतन टाटांनी सुरुवातीला शॉप फ्लोअरवर काम केले. उद्योग समुहात रतन टाटांचे करिअर सुरू झाले ते 1971 मध्ये राष्ट्रीय रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेडचे (नेल्को) डायरेक्टर इन्चार्ज म्हणून. तेथे त्यांनी कंपनीने इलेक्ट्रॉनिक्सऐवजी उच्च औद्योगिक उत्पादनांच्या विकासात गुंतवणूक करावी यासाठीची सूचना केली. सुरुवातीला जेआरडी टाटा याविषयी फारसे अनुकूल नव्हते. रतन टाटांनी कार्यभार सांभाळला तेव्हा कंपनीची इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत अवघे दोन टक्के हिस्सेदारी होती. विक्रीचा तोटा जवळपास चाळीस टक्क्यांवर होता. मात्र, तरीही जेआरडींनी या प्रस्तावावर विश्वास ठेवला आणि कंपनीने भरारी घेतली. त्यानंतरच्या दहा वर्षात ते कंपनीच्या अध्यक्षदापर्यंत पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा मोटर्सने १९९८ मध्ये टाटा इंडिका ही भारतीय कार सुरू केली. यातून हळूहळू टाटा समूहाची ओळख वाढू लागली. यानंतर रतन टाटांनी स्वप्न   पाहिलेल्या टाटा नॅनो बनवलेल्या छोट्या कारची सुरूवात केली, जी भारताच्या इतिहासातील सर्वात स्वस्त कार होती. त्यानंतर, रतन टाटा यांनी २०१२ मध्ये टाटाच्या सर्व महत्त्वाच्या पदांवर मुक्तता जाहीर केली. टाटा सध्या चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदावर आहेत.

    समुहातील आपल्या २१ वर्षांच्या करिअरमध्ये रतन टाटांनी कंपनीची उलाढात तब्बल ४० टक्क्यांनी वाढवली. त्यातून कंपनीचा फायदा ५० टक्क्यांवर पोहोचला. जेव्हा रतन टाटांनी कार्यभार स्वीकारला तेव्हा वस्तू विक्रीतून कंपनीचा फायदा व्हायचा. मात्र, जेव्हा त्यांनी कंपनीचे अध्यक्षपद सोडले तेव्हा हा ब्रँड बनला होता. रतन टाटांनी जेव्हा समुहाचे अध्यक्षपद स्वीकारले, तेव्हा टाटा टी ब्रँडअंतर्गत टीटले, टाटा मोटर्सअंतर्गत जग्वार, लँडरोव्हर आणि टाटा स्टीलच्या ब्रँडअंतर्गत कोरसची खरेदी केेली. यातून टाटा ग्रुप ग्लोबल बिझनेसमध्ये दाखल झाला. या ग्रुपचा 65 टक्के रेव्हेन्यू जवळपास 100 देशांमध्ये पसरलेल्या उद्योगांतून येतो. वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी डिसेंबर 2012 मध्ये कंपनीचे अध्यक्षपद सोडून आपल्याजागी सायरस मेस्री यांना नियुक्त केले. सायरस मेस्री हे शापूरजी पालनजी ग्रुपचे अध्यक्ष पालनजी मेस्री यांचे सुपुत्र. मात्र, अंतर्गत घडामोडींमुळे 24  ऑक्टोबर  2016 मध्ये सायरस मेस्रींना या पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर पुन्हा रतन टाटा नव्याने अध्यक्षपदावर आले. टाटांनी नुकतीच आपली गुंतवणूक स्नॅपडीलमध्ये केली आहे. टीबॉक्स, कॅशकरो अशा नव्या प्रोजेक्टमध्येही टाटांनी गुंतवणूक केली आहे. रतन टाटांनी सार्वजनिक जिवनातही एक उद्दात्तपणा जपला. ते पंतप्रधान व्यापार व उद्योग समितीचे सदस्यही होते. आशियातील आएएनडी सेंटर ऑफ एशियाच्या सल्लागार समितीवरही होते.

    भारतीय एड्स कार्यक्रम समितीचे सक्रिय कार्यकर्तेही म्हणून ते वावरले. केवळ देशातच नव्हे तर परदेशातही त्यांचे नाव दिसते. रतन टाटा मित्सुबिशी सहकारी संस्थेच्या आंतरराष्ट्रीय सल्लागार समितीचे सदस्यही होते. अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप जे. पी. अ‍ॅलन हॅमिल्टोमध्ये मॉर्गन चेज अँड बझमध्येदेखील सहभाग आहे. रतन टाटांच्या या गौरवशाली कामगिरीत त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने त्यांना २००० सालमध्ये पद्मभूषण आणि २००८ मध्ये पद्मविभूषणने भारताच्या आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित केले. वैयक्तिक आयुष्यात रतन टाटांना पाळीव प्राणी खूप आवडतात. त्यांना विमान चालविणेही आवडते. त्यासाठी त्यांनी परवानाही मिळाला आहे. रतन टाटा आयुष्यात ४ वेळा प्रेमात पडले. पण त्यांचे लग्न कधीच झाले नाही. मैत्रिणीने भारतात राहण्यास दिलेला नकार हे त्यामागील कारण त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

    तसे रतन टाटा हे शालिन व्यक्तिमत्त्व म्हटले पाहिजे. समाजातील चमकोगिरीवर त्यांचा फारसा विश्वास नाही. मुंबईत कुलाबा येथील एका फ्लॅटमध्ये ते एकटे राहातात. आई-वडिलांच्या दुराव्यातून झालेल्या भावनिक कोंडीवर रतन टाटांनी पुढच्या आयुष्यात मात केली. कर्तव्यकठोरता, सामान्यांसोबतची जवळीक हे त्यांचे गुण. त्यातूनच त्यांनी सदैव कंपनीचे हित पाहिले. त्यासाठी प्रसंगी उच्चपदस्थांची उचलबांगडी करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. डतर परिश्रमाला पर्याय नाही, हा त्यांचा मूलमंत्र. जेआरडींनी नस्ली वाडिया यांच्याऐवजी रतन टाटा यांना उत्तराधिकारी म्हणून निवडले. आणि त्यांनी त्याचे सोने केले असेच म्हटले जाते. 

    दानशूर उद्योग समूह : दानशूर उद्योग समूह अशी टाटा ग्रुपची ओळख आहे. या समुहाने अलिकडेच कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी १५०० कोटी रुपयांची देणगी दिली. टाटा ट्रस्टने ५०० कोटींचा निधी दिला असून टाटा सन्सनेही अतिरिक्त १००० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. केवळ टाटा ट्रस्टच नाही तर जेएन टाटा एंडोमेंट, सर दोराबजी टाटा ट्रस्ट, सर रतन टाटा ट्रस्ट, लेडी टाटा मेमोरियल ट्रस्ट, लेडी मेहरबाई डी. टाटा एजुकेशन ट्रस्ट, जेआरडी और थेल्मा जे. टाटा ट्रस्ट अशी काही नावे आहेत, जी अनेक दशके आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, समुदाय विकास या क्षेत्रात कार्यरत आहेत. सामान्य परिस्थितीत ट्रस्ट दरवर्षी चॅरिटीसाठी सुमारे १२०० कोटी खर्च करते. ऑगस्ट २०१८मध्ये, केरळमध्ये अभूतपूर्व पूर आला तेव्हा टाटा ट्रस्टने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला. वनक्षेत्रात आदिवासी मुलांना अन्न पुरवण्यासाठी या गटाने अन्नपूर्णा केन्द्रीय स्वयंपाकघर प्रकल्प सुरू केला आहे. टाटा ट्रस्टची भारतात शेकडो हॉस्पिटल आहेत, री जी कमी खर्चात कॅन्सर व अनेक असाध्य आजारावर उपचार करतात. 
(Published On 25/04/2020)

News-In-Focus