टेट्रापॅकपासून स्कूल डेस्क, वार्षिक 750 टनाचे रिसायकलिंग

टेट्रापॅकपासून स्कूल डेस्क, वार्षिक 750 टनाचे रिसायकलिंग

    मुंबईत, 2012 मध्ये ‘गो ग्रीन विथ टेट्रापॅक’, ‘टेट्रापॅक लाओ, क्लासरुम बनाओ’ ही कँम्पेन लाँच झाली. रोजच्या वापरातील टेट्रापॅक ही अशी वस्तू की ज्यातील पदार्थाचा वापर केल्यानंतर कचराच शिल्लक राहतो. त्यांच्यापासून बनविलेले स्कूल डेस्क सरकारी शाळांना भेट देण्यात आले. ही कमाल आहे, आजघडीला ‘आंत्रप्युनर’ म्हणून परिचित असलेल्या मोनीशा नरके यांची. आपली मुलगी सतत आजारी पडू लागली. त्याचे कारण आहे वाढते प्रदूषण. मग, ते कमी कसे करता येईल याचा शोध घेत मोनीशा यांना टेट्रापॅक रिसायकलींगची आयडिया सुचली आणि मग सुरू झाला एका नव उद्योजिकेचा प्रवास.

    ‘दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या चार वर्षांच्या मुलीला सतत खोकला लागायचा. मला काळजी वाटू लागली.  मी तिला सतत औषधे देऊ इच्छित नव्हते. मला यावर पूर्णपणे उपाय शोधायचा होता’ मोनीशा सांगतात. एक उद्योजिका म्हणून कार्यरत असताना त्या पर्यावरणाच्या प्रश्नानं त्यांना अस्वस्थ केलं. हवा प्रदूषण हे मुलीच्या खोकल्यामागील सर्वात मोठं कारण हे त्यांच्या लक्षात आलं. एक जागरुक आई म्हणून त्यांनी त्यामागील साखळी शोधायला सुरूवात केली. एकाजागी डंप केला जाणारा आणि पेटवला जाणारा कचरा हे यामागील मुख्य कारण त्यांनी शोधलं.

    मोनीशा सांगतात, आरोग्य कर्माचऱ्यांकडून, नागरिकांकडून जाळला जाणारा कचरा आणि त्यापासून होणारा ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन, दूषीत हवा यामुळे लोकांच्या आरोग्यावर एक मोठे संकट येते. हे लक्षात घेऊन काहीतरी केले पाहिजे असं माझ्या लक्षात आलं, आणि आपल्या घरापासूनच बदल घडवायचा हे लक्षात घेऊन मी काम सुरू केले. घरगुती कचऱ्यापासून कंपोस्ट तयार करण्याचे प्रयत्न केले. हा प्रयोग यशस्वी झाला आणि मी उत्साहित झाले. जर घराघरात रिसायकलींग सुरू झाले, तर त्याचा परिणाम चांगला होईल हे लक्षात घेऊन मी काम सुरू केलं.

    मोनीशा यांचा समवयस्क, मैत्रिणींचा ग्रुप, जो मुलीच्या स्कूलमुळे तयार झाला होता, तो मदतीला आला. 2009 मध्ये या महिलांच्या ग्रुपने आपले काम सुरू केले... ‘आरयूआय’ अर्थात ‘रिड्यूस, रियूज आणि रिसायकल’आणि गेल्या दहा वर्षात आमूलाग्र बदल त्यांनी घडवले आहेत. वार्षिक 750 टन कचऱ्यावर पुर्नप्रक्रिया, त्यातून  80 टन कार्बनडाय ऑक्साइडचे उत्सर्जन रोखण्यात त्यांना यश आले. विविध माध्यमातून 30 लाख लोकांपर्यंत ही चळवळ त्यांना पोहोचवता आली आहे. बायो कम्पोस्टचे जवळपास शंभर युनिट्स त्यांनी उभारले. तर दोनशेहून अधिक युनीट्सची विक्री केली.

    मोनीशा यांचा स्वयंसेवक ते उद्योजिका असा प्रवास या काळात घडला. पर्यावरणाचे प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेत आरयूआय मेंबर्सनी अभियान चालवले. स्वतःच्या घरापासून ते कचऱ्याच्या ढिगापर्यंत सर्व स्तरावर परिवर्तनासाठी प्रयत्न केले. कचऱ्याच्या डंपिंग, लँडफिल साइट्चे निरीक्षण केले. मुंबईसाठीचे देवनार लँडफिल साइट ही आशियातील सर्वात मोठी कचरा डंपिंग साइट आहे. ही पाहिल्यावर मला वाटू लागले की आपल्याला एक साधे, सोपे रिसायकलींगचे तंत्र गरजेचे आहे असे त्या सांगतात.  

    2010 मध्ये मोनीशा यांनी आरयूआर ग्रीनफिल्डची स्थापना केली. शाश्वत विकासासाठी त्यांनी रिसायकलींगवर काम सुरू केले. मुंबईतील अपार्टमेंट्स, सोसायट्या, शाळा आणि कार्यालयांत प्रभावी जनजागृती सुरू केली. गो ग्रीन विथ टेट्रापॅक या मोहिमेंतर्गत त्यांनी टेट्रापॅकसाठीचे कलेक्शन सेंटर्स सुरू केले. सहकारी बझारपासून रिलायन्स फ्रेशपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी वापरलेले टेट्रापॅक जमविण्यासाठी सेंटर्स सुरू केले. त्यांच्यापासून स्कूल डेस्क, उद्यानांमधील बेंच, पेन स्टँड, कोस्टर्स, ट्रे असे साहित्य बनवायला सुरुवात केली. त्यांनी एरोबिक जैव कम्पोझीटर्स विकसित केले, जे नंतर घरांमध्ये, अपार्टमेंट्स, कार्यालयांमध्ये बसवले गेले.

    मोनीशा यांना लहानपणी इंजिनीअर व्हायचं होतं. त्या सांगतात, माझे वडील इंजिनीअर होते. ते स्वतःची कंपनी चालवायचे. माझा भाऊही इंजिनीअर आहे. मी नेहमी वडिलांसोबत कारखान्यात जात असे. मशीन्सचे मला खूप आकर्षण होते. 1992 मध्ये त्या वीरमाता जीजीभाई टेक्नॉलॉजी इन्सिट्यूटमध्ये (व्हीजेआयटी) दाखल झाल्या. 1996 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवी त्यांनी घेतली. अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून इंडस्ट्रील इंजिनीअरिंग, इंजिनीअरिंग मॅनेजमेंट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 1998 मध्ये सन मायक्रोसिस्टीम या कॅलिफोर्नियातील आयटी कंपनीत त्या रुजू झाल्या. दोन वर्षे त्यांनी नोकरी केली. त्यानंतर त्या मुंबईत परतल्या. वडिलांच्या क्लेनझेड्स कंटामिनेशन कंट्रोल्स या फार्मास्युटिकल्स आणि बायोटेक सेक्टरमधील कंपनीत त्या रुजू झाल्या. तिथे टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली. ज्यावेळी आरयूआर संस्थेची त्यांनी स्थापना केली, त्यानंतर त्यांनी नोकरी सोडली.

    आरयूआर या संस्थेच्या माध्यमातून त्यांना नवीन काहीतरी करायचे होते. मात्र एकटी व्यक्ती काही करू शकत नाही हे त्यांना माहीत होते. दोन कर्मचारी घेऊन त्यांनी ही संस्था सुरू केली. प्रॉडक्ट डिझाइनवर त्यांनी भर दिला.  त्यांच्या टीमने स्थानिक नगरसेवक, शैक्षणिक संस्था, अपार्टमेंट्समध्ये कार्यशाळा घेतल्या. या काळात रिसायकलींच्या क्षेत्रातील खूप माहिती त्यांनी घेतली. रिसायकलींग युनीट्सला त्यांनी भेटी दिल्या. टेट्रापॅक कर्टन्स कसे रिसायकल केले जातात, त्याच्या शीट्स कशा बनवल्या जातात, ऑटोरिक्षासाठी त्यांचा कसा वापर केला जातो हे त्यांनी पाहिले. त्यानंतर वापी येथे स्वतःचे युनीट उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टेट्रापॅकच्या पुर्नवापराबाबत जनजागृती करण्याचा आम्ही निर्णय घेतला.

    आमच्या असे लक्षात आले की, टेट्रापॅकच्या रिसायकलविषयी लोकांमध्ये फारशी जागृती नाही. त्यामुळे 2010 मध्ये आम्ही गो ग्रीन विथ टेट्रापॅक ही मोहीम सुरू केली.  सहकारी बझार आणि रिलायन्स फ्रेश आदींशी सहयोग करून आरयूआर ग्रीनलाइफ सुरू केली. मुंबईत सध्या सार्वजनिक ठिकाणी अशी 44  कलेक्शन सेंटर्स आहेत तर शाळा, सोसायट्या, ऑफिसेस अशा खासगी ठिकाणी 180 सेंटर्स आहेत. पुण्यातही अशा प्रकारची पाच केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ज्यावेळी टेट्रापॅकची कर्टन्स जमा होतात, ती लगेच रिसायकलींग युनिटकडे पाठवली जातात. त्यापासून कम्पोझिट शीट्स तयार केली जातात. त्यानंतर गरजेनुसार त्यापासून वस्तू निर्मिती होते. गुजरातमध्ये उंबरेगाव येथे त्याचे पेन स्टँड, कोस्टर्स, फोटो फ्रेम अशा वस्तू सुरू केल्या जातात. 2012 मध्ये गो ग्रीन विथ टेट्रापॅक आणि कर्टन्स लाओ, क्लासरूम बनाओ अशा कँम्पेनचे लाँचिंग करण्यात आले. त्यापासून तयार केलेल्या बेंचीस सरकारी शाळांमध्ये देण्यात आल्या.

    याचबरोबर संस्थेने बीन से बीच तक अशी कँम्पेन राबवली. त्यातून कम्पोझिट शीट्स तयार करून त्यापासून गार्डन्समध्ये बेंचेस तयार केले. दीडशेहून अधिक गार्डन्स बेंचेस आणि 260 हून अधिक डेस्क स्कूलमध्ये देण्यात आले. बांद्रातील सुपारी टँक म्युनिसिपल स्कूलमध्ये 2018 मध्ये दहा बेंचीस देण्यात आल्याचे स्कूलच्या मुख्याध्यापिका माधुरी डिझोजा यांनी सांगितले. मुलांनी टेट्रापॅक कॅन्स जमा केले. त्यापासून हे बेंचेस तयार करण्यात आले. या उपक्रमातून मुलांमध्ये कचऱ्याविषयीचा अवेअरनेस जागृत झाला.

    2014 ते  2016 या काळात मोनीशा यांनी बायो कम्पोष्टर तयार करण्यावरही काम केले. माझ्या अनुभवावरून असे लक्षात आले की, सर्वसामान्य लोकांना या कामात काय अडचणी येतात. त्यानंतर आरयूआरने यातील आपले पहिले मॉडेल तयार केले. इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) तर्फे सर्टिफाइड असलेल्या या प्रोजेक्टला दी अॅरोबिक आरयूआर ग्रीनगोल्ड बायो कम्पोस्टर (आरजीजीसी) असे नाव देण्यात आले. किचन वेस्टपासून जैविक खतनिर्मितीचा हा प्रयोगही यशस्वी झाला. संस्थेने याबाबतच्या पेटंटचेही डिझाइन केले. या अॅरोबिक बायोकम्पोस्टरमधून दररोजच्या किचनमधील टाकाउ पदार्थांपासून निसर्गिक पद्धतीने खत निर्मिती केली जाते. यासाठी ना विजेचा खर्च येतो ना इतर कोणताही. आरजीजीसी-एक्सएस अशा मोड्यूलसाठी पंधरा हजार रुपये तर त्यापेक्षा मोठ्या युनिटसाठी 62,000 रुपये खर्च येतो. सध्या संस्थेने अशी शंभर युनिट सुरू केली आहेत. त्याची वार्षिक देखभाल केली जाते. 

    पर्यावरणाचे भान हवे : लोकांना त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक तातडीने व्हावी अशी अपेक्षा असते. मात्र, त्यासाठी पर्यावरणाचे भान ते ठेवत नाहीत. आरयूआरने याबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली असे मोनीशा यांनी सांगितले. मात्र पर्यावरण रक्षणाच्या या चळवळीत खूप अडथळे आहेत असे त्या सांगतात. लोकांना नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका आपल्याकडील कचरा घेऊन जातात इतकीच माहिती असते. मात्र, त्याचे योग्य रितीने विल्हेवाट लावली जाते का हे त्यांना माहीत नसते. आपण आपल्या पर्यावरणाच्या रक्षणाप्रती सजग राहीले पाहिजे असे त्यांनी वाटते. शाश्वत विकासाकडे आपण लक्ष दिले पाहिजे.
    आम्ही लोकांसमोर वेस्ट मॅनेजमेंटचे चांगले पर्याय घेऊन जाऊ इच्छितो. देशभरात कम्पोस्टिंगचे मोठे दोनशे प्रोजेक्ट सुरू करण्याचे आमचे उद्दीष्ट आहे असे मोनीशा म्हणाल्या. 2021 पर्यंत देशभरात बायोकम्पोस्टिंग आणि वेस्ट रिसायकलींग प्रोजेक्ट पोहोचविण्याचे धेय्य त्यांनी ठेवले आहे.
(Published On 18/04/2020)

News-In-Focus