सिक्कीमच्या शिक्षकाचे प्लास्टिक पॅकेट्स रिसायकलचे मॉडेल

सिक्कीमच्या शिक्षकाचे प्लास्टिक पॅकेट्स रिसायकलचे मॉडेल
    “एक शिक्षक म्हणून मी नेहमी गावच्या, मी जिथे काम करतो त्या ठिकाणाबाबत विचार करतो. आमची कृती सर्वप्रथम स्वच्छतेचा संदेश देते...,” 35 वर्षीय गणिताचे शिक्षक लोमास ढेंगेल सांगत होते. लोमास हे सिक्कीममधील मखा गावच्या वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील गणित, विज्ञान या विषयांचे शिक्षक. पण त्यांची ओळख एवढ्यापुरतीच मर्यादीत नाही. जवळपास 85000 प्लास्टिक पॅकेट्सचा पुर्नवापर करून त्यांनी जवळपास 6000 नोटबुक्सना कव्हर बनवली. स्थानिक महिलांचे या उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन, पुनरुत्थान झाले. एक वेगळ्या विचारांचे मिशन अशीच ओळख लोमास यांची आहे. 
    लोमास यांनी 2015 मध्ये हरियो मखा- सिक्कीम अगेन्स्ट पोल्यूशन (हरिया म्हणजे ग्रीन) या प्रोजेक्टवर काम सुरू केले. स्थानिक मुलांच्या समस्यांवर लक्ष केद्रीत करीत, वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रयोगांवर काम सुरू केले. अशा उपक्रमांतून पैसे जमवणे आणि त्यातून ज्या गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य नाही, त्यांना मदत करणे हा उद्देश त्यांचा होता. या अंतर्गतच सुरू झालेल्या एका प्रोजेक्टने लोकांचे लक्ष वेधून घेतले. प्लास्टिकमधून मुलांच्या वह्यांना कव्हर घालण्याचा उपक्रम स्कूलमधील शिक्षकांच्या सहभागाने सुरू झाला. मात्र, या उपक्रमाचे दोन टप्पे आहेत. 
    या प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी 2015 ते डिसेंबर 2019 या कालखंडात त्यांच्या स्कूलमधील अन्य शिक्षक आणि अन्य शैक्षणिक संस्थांनी जवळपास 55,000 प्लास्टिकच्या तुकड्यांचा पुनर्वापर करण्याच्या उपक्रमात सहयोग दिला. जवळपास 4,000 नोटबुक्समध्ये याचा वापर केला गेला. दोन वर्षांपूर्वी लोमास यांनी या योजनांच्या उपग्रेडेशनचा विचार केला. कचरा जमा करून त्याचे रिसायकलींग कसे करता येईल यावर त्यांनी भर दिला. स्कूलच्या आसपासचा, शेजारच्या ठिकाणांवरून कचरा जमवला. त्याचे विलगीकरण करून त्यातील सुक्या कचऱ्याला कचरा विकत घेणारे ठेकेदार आणि रिसायकलींग युनीट्सना विक्री केला गेला. मात्र, 2013 आणि 2014 या दोन वर्षांत त्यांना या योजनांतील फोलपणा लक्षात आला. त्यातून कोणतेही विकासात्मक मॉडेल उभे राहू शकेल असे त्यांना वाटले नाही. 
    त्यामुळे डिसेंबर 2014 मध्ये ते चिप्स, बिस्किट्स, चहापूड आणि प्लास्टिकच्या रिकाम्या पॅकेट्सच्या पुनर्वापराचा विचार सुरू केला. माखा गावातील आणि आसपासच्या भागातून प्लास्टिक एकत्र केले गेले. मात्र, आणखी प्लास्टिक तुकड्यांची गरज भासू लागली. त्यामुळे आसपासच्या दहा सरकारी आणि खासगी शाळांतील मुलांना आजुबाजूच्या गावांतून प्लास्टिक जमा करण्याचे आवाहन केले गेले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.  ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधून याला चांगला सपोर्ट मिळाला. मुलांनी प्लास्टिक पुनर्वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. या कामात इच्छूक लोकांना दिवसातील फक्त 15 मिनीटे देण्याचे आवाहन केले गेले.
    “आम्हाला माखा आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी, विचारी लोकांचा सपोर्ट मिळाला. आम्ही आदर्श विद्यामंदिरचे प्राचार्यांशी संपर्क केला. त्यांना 2016-17 या शैक्षणिक वर्षाच्या उत्तरार्धात मुलांची पुस्तके, वह्या यांसाठी प्लास्टिकच्या पुनर्वापराबाबत विनंती केली. मार्च 2017 पूर्वी आम्ही सर्व काम पूर्ण करून त्यातून जवळपास 14,000 रुपयांची कमाई केली” असे लोमास ढेंगेल यांनी सांगितले. या पैशांचा वापर एका विद्यार्थ्याच्या 2017मध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (इग्नू) पदवीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी करण्यात आला.  2015 ते 2019 मध्ये ढेंगेल यांच्या टीमने सिक्कीममध्ये 20 हून अधिक स्कूल, शैक्षणिक संस्थांमध्ये आपले उपक्रम पोहोचवले. स्वयंसेवकांसाठी आपले उपक्रम, आयडिया त्यांनी शेअर केल्या. 
    दुसऱ्या टप्प्यात 2015 मध्ये कचरा रिसायकलींगच्या संकल्पनांवर त्यांनी सतत काम केले. ढेंगेल यांनी अजांबरी सेल्फ हेल्फ ग्रुप (एसएचजी) या माखापासून जवळच असलेल्या सिंगाबेल येथील एका स्वयंसेवी संस्थेशी जोडून घेतले. या संस्थेचे सक्रीय पाठबळ मिळाल्यानंतर त्यांनी एसएचजीएसच्या माध्यमातून महिलांना सशक्त बनविण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. नोव्हेंबर 2019 पर्यंत त्यांनी या भागातील, एव्हीएम या संस्थेच्या माध्यमातून परिसरातील सर्व मुलांच्या पुस्तकांना प्लास्टिकच्या पुनर्वापराने युक्त होतील याची काळजी घेतली. सिंगाबेलमध्ये प्लास्टिक कलेक्शन सेंटरची सुरुवात करण्यात आली. 
    केवळ प्लास्टिकचा पुनर्वापर हे एकमेव उद्दीष्ट त्यांच्यासमोर नव्हते. तर या माध्यमातून रोजगाराचे एक मॉडेल महिलांसाठी विकसीत व्हावे, जे कायमस्वरुपी रहावे यासाठी प्रयत्न केले गेले.  “सिंगाबेलमध्ये पाच विविध स्वयंसेवी संस्थांच्या, एसएचजीएसच्या माध्यमातून सप्टेंबर 2019मध्ये झालेल्या बैठकांतून त्यांनी प्लास्टिक पुनर्वापरावर अधिक भर देण्याचे निश्चीत केले. एसएचजीच्या सदस्यांच्या रुपात, माखामधील उच्च माध्यमिक स्कूलमधील विद्यार्थ्यांचे पालकच योजनेत सहभागी झाले होते. 60 महिलांनी एसएचजीच्या अजांबरी, उदन, स्मरिका, चांदनी आणि निलम  या पाच गटांतून प्लास्टिक एकत्रिकण केले त्याच्या पुनर्वापराचे काम अजांबरीद्वारे केले गेले. चार महिन्यांत सुमारे तीनशे व्हालंटीयर, विविध बारा सरकारी शाळांतील शिक्षक आणि विद्यार्थी तसेच आणखी दोन खासगी शाळांतील शिक्षक, विद्यार्थ्यांनी 30,000 प्लास्टिकचे तुकडे जमवले.
    हे प्लास्टिकचे तुकडे आसपासच्या चौदा स्वयंसेवी शाळा आणि गावांमधून एकत्र केले गेले होते. काही स्थानिक स्वयंसेवकांनीही यात मोलाची मदत केली. मोठ्या आकाराचे प्लास्टिकचे तुकडे पुनर्वापरासाठी एकत्र केले गेले. सर्व नोटबुक आणि कॉपीज जवळपास 2020 एव्हीएम स्कूलच्या बॅचेजसमधील विद्यार्थ्यांना कव्हर करण्यात यशस्वी ठरल्या.
    “आमचे काम केवळ पुस्तकांपुरते मर्यादीत होते. मात्र, हरिया माखो उपक्रमातून एक वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण मिळाले. आम्ही एकत्र काम करतो. एका उज्ज्वल भविष्यासाठी काम सुरू आहे असे अजंबरीचे सदस्य कृष्ण शर्मा यांनी सांगितले. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जवळपास 2100 पुस्तके आणि वह्या एसएचजीने कव्हर केल्या. त्यातून जवळपास 21,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एसजीएच यासाठी प्रत्येक पुस्तकासाठी दहा रुपये शुल्क आकारणी करते. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा एसएचजीच्या किमान दोन सदस्यांच्या शिक्षणासाठी खर्च केला जातो. जवळपास  15  वर्षांपूर्वी अनेक महिलांना त्यांचे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आहे. आता या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना एक नवी संधी मिळत आहे. स्वेच्छेने दिल्या गेलेल्या या योगदानाबरोबरच जमा होणारे उत्पन्न अतिशय गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले जातात” असे ढेंगेल सांगतात. 
    दरम्यान, एव्हीएमने ज्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांना प्लास्टिकने कव्हर केले गेले, त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी जाऊन प्लास्टिकच्या पुनर्वापराविषयीचे प्रयत्न करण्यासंबंधी प्रोत्साहन देण्यात आले. आमच्या तिसऱ्या टप्प्यात ईएनव्हीआयएस विभागासोबत काम करीत आहोत. ग्रामीण विभाग विकास आणि सिक्कीमधील कमीत कमी दहा एसएचजी आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समन्वयातून जवळपास पाच लाखहून अधिक प्लास्टिकचे तुकडे जमा होतील. त्यांच्यावर पुनर्वापराचे प्रयोग करता येतील असे ढेंगेल यांना वाटते. त्यांना ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबवली जावी असे वाटते. या छोट्या उपक्रमाच्या माध्यमातून आजवर सात विद्यार्थ्यांना इग्नू तसेच एनआयओएस यांसारख्या संस्थांमध्ये आपले शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेता आला आहे. याशिवाय या वर्षी आणखी पाच विद्यार्थ्यांना यातून शिक्षणाची संधी मिळू शकेल असे ते सांगतात.
    “एक शिक्षक या नात्याने मी नेहमी माझे काम, गाव आणि परिसरासाठी उपयुक्त कसे ठरेल याकडे अधिक लक्ष देतो. स्वयं साह्यता गटांच्या माध्यमातून होणाऱ्या चर्चेवेळी मला असे लक्षात आले की या परिसरातील कुटुंबांतील महिलांना शिक्षण पूर्ण करण्यास अडथळे आले. हा उपक्रम अशा महिलांना, कुटुंबांना आर्थिक मदतीची ठरताना, त्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनेही त्यांना प्रेरणा देणारा ठरेल” असे ढेंगेल यांनी सांगितले. बुक कव्हरिंग युनीट चालवताना वाया गेलेले प्लास्टिकचे तुकडे वापरल्याने असे तुकडे नष्ट करताना होणारे प्रदूषण टाळण्याचा मुख्य हेतू सफल होतो. याशिवाय, यातून एक रोजगार संधीही लाभते. ही संकल्पना शाश्वत विकास, स्वस्त आणि शून्य प्रदूषण करणारी आहे. याशिवाय, ठराविक कालावधीत रोजगार निर्मितीसाठीही उपयुक्त आहे.
(Published On 25/04/2020)

News-In-Focus