शेतीपासून अंतराळापर्यंत स्टार्टअप्सचा स्कोप 

शेतीपासून अंतराळापर्यंत स्टार्टअप्सचा स्कोप 

जच्या स्टार्टअप्स या उद्याच्या मल्टिनॅशनल कंपन्या आहेत. शेती क्षेत्रापासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंत सर्वच प्रकारच्या स्टार्टअपला स्कोप वाढत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ओरिसामधील आयआयएम संबलपूरमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्र सरकार यामध्ये रिफॉर्म आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने आगामी काळात बदल जाहीर होतील असे यावेळी सांगण्यात आले. 

बहुतांश स्टार्टअप्स देशातील टिअर 2 आणि टिअर-3 शहरांमधून येत आहेत. कोरोना व्हायरसच्या महामारीनंतरही गेल्यावर्षी भारतात अधिक युनिकॉर्न पहायला मिळाले. युवकांच्या मनातील ब्रँड इंडियाचे हे प्रदर्शन आहे. देशात यापूर्वी 2014 पर्यंत, 13 आयआयएम होते. आज त्यांची संख्या वीसवर पोहोचला आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाला यातील प्रतिभावंत युवक मदतगार ठरणार आहे. आगामी काळातही मल्टिनॅशनल्सची संख्या वाढणार आहे. मात्र, वर्क फ्रॉम एनीव्हेअर कन्सेप्टने जगाची परिभाषा बदलली आहे. आगामी काही महिन्यात यासाठी पूरक बदल केले जातील असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. 

दरम्यान, याउलट प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार 44 टक्के स्टाअर्टअपला कोरोना महामारीचा फटका बसला आहे. लघू आमि मध्य उद्योगांसह स्टाअर्टअपसमोर 2020 मध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. 2020 मध्ये टेक स्टार्टअपमध्ये 44 टक्क्यांची घट झाली. त्याआधीच्या वर्षात, 2019 मध्ये एकूण टेक स्टार्टअप 5,509 होते. त्यापैकी फक्त 3,061 स्टार्टअप सध्या सुरू आहेत. टेक स्टार्टअपनी इक्विटी फंडिंगमधून 30.9 टक्के कमी भांडवल उभारले गेले. आता फुड डिलिव्हरी, डिजिटल वॉलेट, इंटरनेट फर्स्ट रेस्टॉरंट, ई कॉमर्स लॉजिस्टिक सर्व्हिसेस, व्हर्नाकुलर न्यूज अॅग्रीगेट्स आदी मॉडेल्सना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे. 

News-In-Focus