जादा पीएफ कटिंग करताय, मग पीएफवर लागणार टॅक्स 

जादा पीएफ कटिंग करताय, मग पीएफवर लागणार टॅक्स 

केंद्र सरकारने सादर केलेल्या 2021च्या अर्थसंकल्पात नोकरदारांना मोठा झटका बसला आहे. जर तुम्ही तुमच्या प्रॉव्हिडंट फंडात जादा कपात करत असाल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सादर केलेल्या बजेटमध्ये प्रॉव्हिडंट फंडाच्या कपातीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. जर तुम्ही 2.5 लाख रुपयांहून अधिक पीएफ कपात करीत असाल तर तुम्हाला त्यावर इन्कमटॅक्स भरावा लागणार आहे. 

प्रॉव्हिडंट फंड अॅक्ट, 1925 (19 - 1925) मधील नियम 10 आणि 11 अनुसार ईपीएफवरील व्याज पूर्णपणे टॅक्स फ्री आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचारी जादा पीएफ कपात करतात. कारण त्यांना त्यावर चांगले व्याज मिळते. यासाठी अनेक कर्मचारी व्हॉलएंटरी प्रॉव्हीडंट फंडात (व्हीपीएफ) कपात करतात. मात्र, आता सरकारच्या या निर्णयामुळे पगारातून जादा उत्पन्न असलेल्या नोकरदारांना फटका बसणार आहे की जे टॅक्स फ्री उत्पन्नासाठी व्हीपीएफ कपात करतात. 

याशिवाय सरकारने ULIPच्या सेक्शन 10 (10 डी) च्या अंतर्गत एक वर्षामध्ये 2.5 लाख रुपयांहून ज्यादा प्रिमियमवर कर सवलत रद्द करण्यात आली आहे. सध्याच्या यूलीपवर हा नियम लागू नसेल. मात्र, एक फेब्रुवारी 2021 नंतर घेतलेल्या सर्व पॉलिसींवर याचा परिणाम होणार आहे. 
याशिवाय यंदाच्या बजेटमध्ये नोकरदार वर्गाला काहीच मिळालेले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये नोकरदारांसाठी काहीच घोषणा केलेली नाही. त्यामुळे इन्कमटॅक्स स्लॅब जुनाच राहणार आहे. याउलट अॅग्री अँड इन्फ्रा डेव्हलपमेंट सेसही लावला जाणार आहे. 
गेल्यावर्षी अर्थ मंत्रालयाने नोकरदार वर्गासाठी दोन टॅक्स ऑप्शन दिले होते. हे ऑप्शन आर्थिक वर्ष 2020-21 पासून लागू झाले आहेत. करदाते इन्कमटॅक्स रिटर्न भरताना यापैकी कोणताही एक ऑप्शन निवडतात. ही पद्धती 2021-22 मध्येही सुरू राहणार आहे. नव्या टॅक्स स्लॅबमध्ये कोणत्याही पद्धतीची इन्कमटॅक्स सवलत दिलेली नाही. जर करदाते जुन्या पद्धतीचा टॅक्स स्लॅब निवडतात, तर त्यांना सर्व प्रकारच्या करांतून सूट मिळणार आहे. 

यावर मिळणार इन्कमटॅक्स कपातीमधून सूट
80Cमधील गुंतवणूक 
घरभाडे भत्ता 
ट्रॅव्हलिंग अलौन्स 
आरोग्य विमा प्रिमियम (मेडिक्लेम) 
स्टँडर्ड डिडक्शन 
सेव्हिंग (बचत) खात्यावरील व्याज
एज्युकेशन लोनवरील व्याज 
राष्ट्रीय बचत योजनेतील गुंतवणूक 
होम लोनच्या व्याजावरील सूट 
कलम 16 अन्वये एंटरटेनमेंट टॅक्स 

नव्या टॅक्स स्लॅबचे फायदे 
व्हीआरसमधून मिळणारी रक्कम
रिटायरमेंटवर पीएऐवजी रोख पैसे
डेथ मॅच्युरिटी अमाउंट
जीपीएफमधून मिळणारे व्याज
सुकन्या समृद्धी खात्यातून मिळणारी रक्कम
स्‍कॉलरशीप
ग्रॅच्युईटी
1.5 लाखावरील गुंतवणुकीवर टॅक्स रिबेट
शेतीमधील उत्पन्न 
जीवन विम्यातून मिळणारे उत्पन्न 

News-In-Focus