5 ते 10 लाख रुपये गुंतवताय, अशी करा विभागणी 

5 ते 10 लाख रुपये गुंतवताय, अशी करा विभागणी 

केंद्र सरकारे आर्थिक वर्ष 2021-22 साठीचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर केले. तेव्हापासून शेअर मार्केटमध्ये तेजीची घोडदौड सुरू आहे. आतापर्यंत सेन्सेक्स 5000 पेक्षा अधिक अंकांनी उसळला आहे. तर निफ्टीही 10 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे मार्केट एक्स्पर्ट्सनी गुंतवणूकीसाठी काही नव्या सूचना केल्या आहेत. जर तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये गुंतवायचे असतील तर ही वेळ योग्य आहे. 

प्रख्यात अर्थतज्ज्ञांच्या मते जर तुम्ही 100 रुपये गुंतवायचे असे ठरवले असेल तर त्यापैकी 25 रुपये इक्विटी मार्केटमध्ये गुंतवले पाहिजेत. उर्वरीत पैसे 3 ते 6 महीन्यांसाठी गुंतवायला हवी. इक्विटीसोबतच म्युच्युअल फंड, एसआयपी यात गुंतवणूकीचे पर्याय योग्य आहेत. शेअर बाजारातील तेजीने जागतिक स्तरावरही चांगले संकेत दिले आहेत. त्यामुळे मार्केट आणखी उसळी घेईल असे वाटते. जर तुम्हाला 5 ते 10 लाख रुपये गुंतवायचे असतील तर त्याची विभागणी 40 टक्के इक्विटी,  20 टक्के इक्विटी म्यूचुअल फंड्स, 15 टक्के डेब्ट फंड, 15 टक्के गोल्ड आणि 10 टक्के कॅशमध्ये गुंतवायला हवेत. लाँगटर्मसाठी चांगल्या रिस्क अॅडजेस्टेड रिटर्नची निवड हवी.

तुमचे वय किती आहे, यावरही गुंतवणूक अवलंबून असेल. म्हणजे तुमचे वय जर 30 वर्षे असेल तर तुम्ही 70 टक्के रक्कम इक्विटीत गुंतवायला हवी. जर तुम्हाला चांगले, जादा रिटर्न मिळवायचे असतील तर त्यासाठी 50 टक्के इक्विटीज, 30 टक्के डेट, 10 टक्के गोल्ड आणि रिटीसमध्ये तसेच उर्वरीत कॅशमध्ये गुंतवले पाहिजेत. काही तज्ज्ञांच्या मते तुम्ही पैसे 65 टक्क्यांपर्यंत इक्विटीजमध्ये गुंतवू शकता. 25 टक्के डेट फंड आणि 10 टक्के लिक्विड फंड असले पाहिजेत. याशिवाय, काहीजण रिअल इस्टेटसेक्टर, फिक्स्ड इन्कम म्हणजेच बाँड्स याकडेही पर्याय म्हणून बघतात. 

गुंतवणूक करताना अॅसेट अलोकेशन महत्त्वाचे ठरते. त्यासाठी तुमचे फायनान्शिअल ऑब्जेक्टिव्ह काय आहेत हे तपासा. मार्केटने गती घेतल्याने इक्विटी हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय आहे. मात्र, त्याचबरोबर डेट मार्केटवरही लक्ष ठेवले पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे. अर्थात यासाठी चांगल्या कंपन्यांची निवड ही अभ्यासपूर्वक करावी. त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. माहितीचा स्रोत काय आहे हे लक्षात घेऊन आपल्याकडे पैशांची इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही रिटर्न चांगले कमवू शकता की नाही हे ठरते. 

News-In-Focus