ग्रोथ फंडचा निर्माता... जॉन टेम्पलटन

ग्रोथ फंडचा निर्माता... जॉन टेम्पलटन

    मुळचे ब्रिटिश वंशीय जॉन टेम्पलटन यांचा जन्म अमेरिकेत झाला. टेम्पलटन हे एक उत्कृष्ट गुंतवणूकदार, फंड व्यवस्थापक आणि मानवतावादी विचारवंत म्हणून ओळखले जातात. १९५४ मध्ये टेम्पलटन यांनी म्युच्युअल  फंड क्षेत्रात प्रवेश केला. त्यांनी म्युच्युअल  फंड क्षेत्राला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे 'ग्रोथ फंड'. १९९९ मध्ये 'मनी मेगेझीन'ने त्यांचा शतकातील 'जागतिक दर्जाचा महान गुंतवणूकदार' म्हणून सन्मान केला होता. जॉन मार्क्स टेम्पलटन यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९१२ मध्ये अमेरिकेतील टेनिसी प्रांतातील विंचेस्टर शहरात झाला. ते १९३४ मध्ये येल विश्वविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी प्राप्त केली. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून कायद्याची पदव्युत्तर पदवी (एम.ए) मिळवली. 

    १९३० च्या महामंदीच्या काळात टेम्पलटन याने न्यूयॉर्क शेअर बाजारातील नोदनीकृत प्रत्येक कंपनीचे १०० शेअर्स खरेदी केले होते. त्यावेळी त्यातील प्रत्येक शेअरची किमत १ डॉलर पेक्षाही कमी होती. एकूण १०४ कंपन्यापैकी ३४ कंपन्या १९३९ मध्ये दिवाळखोरीत गेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेतील औद्योगिक क्षेत्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरु झाली. महामंदीचे मळभ हळूहळू दूर होऊ लागले होते. त्यावेळी टेम्पलटन याने आपल्याकडील शेअरची विक्री करून प्रचंड पैसे कमावले. टेम्पलटन यांच्या म्हणण्यानुसार दुसरे महायुद्ध ज्यादिवशी सुरु झाले, त्याच दिवशी त्यांनी आपल्या शेअर ब्रोकरला बोलावून घेतले आणि त्याला शेअर मार्केटमधील १ डॉलरपेक्षा कमी किमतीचे शेअर खरेदी करण्याची सूचना केली. गुंतवणुकीच्या अशा अनोख्या पद्धतीतून टेम्पलटन कोट्यधीश झाले. ग्लोबली डायवर्सीफाईड म्युच्युअल  फंड्सचा उपयोग करून जॉन टेम्पलटन गुंतवणुकीत कमालीचे यशस्वी झाले होते. 

    १९५४ मध्ये त्यांनी टेम्पलटन ग्रोथ फंड लि. (निवेशक फंड) ची स्थापना केली. या फंडच्या माद्यमातून १९६० च्या दशकात पहिल्यांदाच जपानमध्ये गुंतवणूक केली गेली. जॉन टेम्पलटन यांनी विशेषतः आण्विक उर्जा, रसायने, आणि इलेक्ट्रोनिक्स फंड तयार केले. १९५९ मध्ये त्यांनी आणखी ५ फंड्स तयार करून ते सार्वजनिक केले. नेहमी सकरात्मक विचार, नकारात्मक विचारांना दूर करणे आणि आर्थिक शिस्त या त्रिसूत्रीमुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकल्याचे त्यांनी सांगितले. जॉन टेम्पलटन यांची राहणी अत्यंत साधी होती. कोट्यधीश असूनही त्यांनी कधीही महागडी वस्तू खरेदी करण्याचा अट्टाहास केला नाही. ते स्वतःची कार स्वतःच चालवायचे आणि विमानातून प्रवास करायचा असेल तर प्रथम श्रेणीतूनच प्रवास करायचे. ते गर्दीपासून नेहमीच अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत असत. ८ जुलै १९०८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. 
(Published On 07/03/2020)

News-In-Focus