भारतीय शेअर बाजारातील 'वॉरेन बफेट'... राकेश झुनझुनवाला

भारतीय शेअर बाजारातील 'वॉरेन बफेट'... राकेश झुनझुनवाला

    गुंतवणूक क्षेत्रात काम करणार्या लोकांना वॉरेन बफेट हे नाव जस माहित आहे, अगदी तसच भारतातील गुंतवणूकदारच नव्हे तर सर्वसामान्य भारतीयांनाही माहित असणारे नाव म्हणजे राकेश झुनझुनवाला. झुनझुनवाला यांनी १० हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरु केलेल्या प्रवासाने १५  हजार कोटींचा टप्पा (जुलै २०१७ च्या आकडेवारीनुसार) अगदी सहज ओलांडला. त्यांचा हा प्रवास शेअर बझारच्या माध्यमातून श्रीमंत होण्याची स्वप्ने बघणाऱ्या प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असाच आहे. 

    राकेश झुनझुनवाला यांचा जन्म ५ जुलै १९६० मध्ये मुंबईत झाला. त्यांचे वडील इन्कमटॅक्स अधिकारी होते. त्यांच्या वडिलांना शेअर बाजारामध्ये विशेष रस होता. राकेश झुनझुनवाला यांचे वडील त्यांच्या मित्रांबरोबर शेअर बाजाराविषयी तासनतास गप्पा मारत असत. लहानपनी राकेश देखील या गप्पा अगदी मन लावून ऐकायचा. त्याच्या मनातही शेअर बाजाराविषयी कुतूहल निर्माण झाले. एक दिवस राकेशने आपल्या वडिलांना विचारले  कि, शेअर बाजार खाली- वर कशामुळे होतो? त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना दररोज न चुकता  वृतपत्र वाचण्याचा सल्ला दिला. हा त्यांचा शेअर बाजारातील प्रवेशाचा पहिला धडा होता. 

    राकेश यांनी सिडनेहेम कॉलेजमधून पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियामध्ये 'सीए'ची डिग्री मिळवण्यासाठी प्रवेश घेतला. १९८५ मध्ये त्यांनी सीए' पूर्ण केले. सीए'ची पदवी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांना सांगितलं कि त्यांना शेअर बाजारात करीयर करायचे आहे. त्यावेळी राकेश ना त्यांच्या वडिलांनी निक्षून सांगितले कि, मी तुला त्यासाठी पैसे देणार नाही आणि तू तुझ्या मित्रांकडूनही उधारीवर पैसे घ्यायचे नाहीत. तू स्वतः काही तरी कामधंदा कर आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी पैसे जमव. राकेश यांनी १९८५ मध्ये शेअर बाजारात पदार्पण केले. त्यांच्याजवळ गुंतवणूक करण्यासाठी पैसेच नव्हते. त्यांनी स्वतः साठवलेले १० हजार रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात केली. १९५ मध्ये राकेश झुनझुनवाला जेंव्हा शेअर बाजारात आले त्यावेळी सेन्सेक्स होता १५०.

    राकेश यांनी आपला आत्मविश्वास आणि अभ्यासाच्या बळावर १९८६ मध्ये पहिला नफा मिळवला. त्यांनी टाटा कंपनीचे ५००० शेअर्स ४३ रुपये दराने खरेदी केले होते आणि तीन महिन्यांनी त्यांनी ते शेअर्स १४३ रुपयाप्रमाणे विकले. राकेश यांनी १९८६ ते १९८९ या तीन वर्षाच्या कालावधीत जवळपास २५ ते ३० लाख रुपये कमावले. त्यांना त्यावेळी सर्वात जास्त फायदा मिळवून दिला तो सेसा गोवाच्या शेअर्सने. राकेश झुनझुनवाला यांनी सेसा गोवाचे ४ लाख शेअर्स forword ट्रेडिंग मध्ये खरेदी केले आणि त्यानंतर त्यांनी त्यापैकी २ ते अडीच लाख शेअर्स ६०-६५ रुपये दराने विकून टाकले. त्यातील १ लाख शेअर १५०-१७५ रुपये विकून प्रचंड नफा कमावला आणि तेथेच झुनझुनवाला प्रकाशझोतात आले. त्यांना देशातील बडे बडे गुंतवणूकदार ओळखू लागले. प्रसिद्धी माध्यमांनी ही त्यांची दखल घेतली. 

    झुनझुनवाला यांनी २००२-२००३ मध्ये टाइटन कंपनीचे तब्बल ६ करोड शेअर प्रत्येकी ३ रुपयांना खरेदी केले. ज्यावेळी टाइटन कंपनीच्या एका शेअर्सची किंमत ३९० रुपयांवर पोहचल्यानंतर राकेश यांनी शेअर्स विकले. ज्यामुळे त्यांची गुंतवणूक २१०० कोटी रुपयांवर पोहचली. राकेश झुनझुनवाला यांनी भारतीय शेअर बाजारात स्वतः चा इतिहास घडविला आहे. आजमितीला कोट्यवधी गुंतवणूकदार त्यांना आद्रेश मानून काम करत आहेत. 
(Published On 29/02/2020)

News-In-Focus