गाढवाच्या दुधापासून कमावले कोट्यवधी रुपये

गाढवाच्या दुधापासून कमावले कोट्यवधी रुपये
    पल्या देशात 'गाढव' हा शब्द सहसा एखाद्या व्यक्तीची बौद्धिक हेटाळणी करण्यासाठी वापरला जातो. ज्याला काहीच जमत नहीं त्याला आपल्या देशात 'गाढव' म्हटले जाते. गाढवाचा वापर आपल्या देशात केवळ ओझी वाहण्यासाठी केला जातो. परंतु गाढव हा अत्यंत उपयुक्त आणि फायदा मिळवून देणारा प्राणी असल्याचे कोणी सांगितलं तरी कोणाचाही त्यावर सहसा विश्वास बसणार नाही. गाढवामुळे कोट्यवधीचा फायदा होऊ शकतो, असे सांगितल्यास  लोक उलट सांगणाऱ्यालाच 'गाढव' म्हणून हिणवू लागतील, इतका गाढव हा प्राणी आपल्याकडे दुर्लक्षित झाला आहे. पण गाढव सांभाळणे हा फायदेशीर व्यवसाय असल्याचे  केरळमधील एर्नाकुलममध्ये राहणाऱ्या अबी बेबी यांनी कृतीतून पटवून दिले. 

    बेबी यांची बायबलवर अढळ श्रद्धा आहे. बायबलमध्ये उल्लेख आढळतो कि, जोब यांच्याजवळ तब्बल १००० गाढवीण होत्या. बायबलमध्ये गाढवाला दिलेले महत्व पाहून बेबी अचंबित झाला. त्याला गाढवाबद्दल प्रचंड उत्सुकता लागली. बेबी यांनी त्यानंतर गाढवांवर खूप संशोधन केल आणि एक दिवस त्यांनी आपल्या कुटुंबियांध धक्का दिला. तो धक्का होता बेंगलोरमधील आयटी कंपनीत लाखो रुपये पगार असलेली नोकरी सोडण्याची. २००५ मध्ये बेबी एर्नाकुलम जिल्ह्यातील आपल्या मुळगावी राममंगलमला परतले आणि तेथे त्यांनी गाढवांचे फार्म हाउस सुरु करण्याचा निर्णय घेतला. गाढवीच्या दुधाचे फायदे समजून घेण्यासाठी त्यांनी सतत १० वर्षे विविध संशोधन केले. त्यांना संशोधनातून असे आढळून आले कि, गाढवीच्या दुधाला अनंत काळापासून अमृततुल्य मानले जाते. असं म्हटलं जात कि, प्राचीन इजिप्तची राणी क्लिओपात्रा आपली सुंदरता टिकविण्यासाठी आणि आपल्या त्वचेचे तारुण्य टिकवन्यासाठी गाढवीच्या दुधाने आंघोळ करत असे. त्यासाठी दररोज ७०० गाढवीच्या दुधाचा वापर केला जायचा. 

    गाढवीच्या दुधाचे फायदे लोकांना पटवून देण्यासाठी बेबी यांना खूप मेहनत घ्यावी लागली. कारण गाढवीच्या दुधाची महती फारसी कोणाला माहितच नव्हती. बेबी यांनी गाढवीच्या दुधाच्या मार्केटिंगसाठी अख्खा दक्षिण भारत पालथा घातला. २०१६ पर्यंत त्यांच्याजवळ ३२ गाढवी होत्या. गाढवांचा फार्म हाउस उभारण्यासाठी त्यांना तब्बल १० वर्षे लागली. राममंगलममध्ये त्यांनी अडीच एकर जमिनीवर गाढवांचा फार्म हाउस उभारुन व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. बेबी यांनी हा व्यवसाय सुरु केल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांची टिंगलटवाळी सुरु केली. त्यातच त्यांच्याकडील ३२ गाढवापैकी १५ गाढवं रोगाने मरण पावली. बेबी सागतात कि, हा व्यवसाय त्यांच्यासाठी आणि इतरांसाठीही अगदी नवा होता. त्यांना या व्यवसायात मार्गदर्शन करू शकेल, असे कोणीही नव्हते. पण असे असले तरी बेबी यांनी आपले संशोधन सुरूच ठेवले. किती संकटे आली तरी ते बिल्कुल डगमगले नाहीत. गाढवीचे दुध सर्व रोगांवर गुणकारी समजले जाते. इतकेच नव्हे तर बाह्य शरीरावर गाढवीच्या दुधाने इलाज केले जातात, हे बेबी यांनी कृतीतून पटवून दिले. 

    सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढवीच्या दुधाचा वापर फायदेशीर आणि गुणकारी ठरल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे बेबी यांनी स्वतःचीच सौंदर्य प्रसाधन उत्पादनाची निर्मिती सुरु केली. या सौंदर्य प्रसाधनामध्ये प्रमुख घटक म्हणून त्यांनी गाढवीच्या दुधाचा वापर सुरु केला. त्याचे जे परिणाम आले ते बेबी यांच्या गेल्या काही वर्षांच्या तपश्चर्येचे फळ होते. २०१६ मध्ये त्यांनी आपल्या घराच्या आवारातच छोटीशी कंपनी स्थापन केली. त्याठिकाणी ते फेअरनेस क्रीम, फेशियल क्रीम, शाम्पूआदी विविध प्रकारची उत्पादने सुरु केली. बघता बघता त्यांची कंपनीची उलाढाल काही कोटींच्या घरात पोहचली. त्यांच्याकडे असणाऱ्या एका गाढवाची किमत जवळपास ८० हजार ते एक लाखापर्यंत होती. गाढवीच्या एका लिटर दुधाची किमत जवळपास पाच ते सहा हजार रुपयांच्या आसपास असते. गाध्वीचे दुध इतके महाग असूनही सौंदर्य प्रसाधन निर्मिती करणाऱ्या उद्योगामध्ये गाढवीच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. बेबी यांच्या मते, गाढवीच्या दुधात लेकटॉसची मात्र अधिक असते आणि त्यात भरपूर प्रमाणात विटामिन्सही असतात. 
(Published On 28/03/2020)

News-In-Focus