पर्सनल फायनान्स अर्थात वैयक्तिक वित्त व्यवस्थापन  काळाची गरज

पर्सनल फायनान्स अर्थात वैयक्तिक वित्त व्यवस्थापन  काळाची गरज

    मित्रांनो, चांगल्या शाळेत प्रवेश मिळवणे, खूप- खूप अभ्यास करणे आणि चांगल्या गुणाने पदवी मिळवल्यानंतर आपल्या सर्वांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे चांगले आयुष्य जगण्यासाठी पैसे कमविणे. आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी किती पैशांची आवश्यकता आहे,  हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण  सर्वजन पैशाचे महत्त्व चांगलेच समजतो. नोकरी, व्यवसाय अथवा उद्योगातून पैसे कमावतो आणि खर्च करतो. 
    या कमाई आणि खर्चाच्या दरम्यान आपल्याला आपल्या भविष्यासाठीही काही पैसे शिल्‍लक ठेवावे लागतात. त्यासाठी आपण बँकेत फिक्स डिपॉझिट (एफडी), सोने अथवा जमिनीत गुंतवणूक असे विविध पर्याय निवडतो. साधारणत:   बरेचजण पैशाचे व्यवस्थापन अशाच पध्दतीने करतात आणि काही वर्षांपर्यंत आपल्याकडे भरपूर पैसे जमा होतात. या पैशातून लोक बंगला, आलिशान कार, देशी- परदेशी सहली अशी अनेक  स्वप्न पूर्ण करतात.परंतु आपल्यापैकी बहुतेकजणांना पैशाचे योग्य व्यवस्थापन जमत नाही आणि अनेकदा केवळ नियोजनाअभावी श्रीमंत लोकसुध्दा कफ्फलक झालेले आपल्याला पहायला मिळतात. 
    बहुधा प्रत्येक महिन्याच्या शेवटी अनेकांचे बँक खाते रिक्त असते. कारण पैसा येतो आणि निघून जातो, शिल्‍लक अनेकदा उरतच नाही. त्यामुळे मग एखाद्या इमर्जन्सीवेळी आपल्याला उधार-उसणवारी किंवा कर्जाचा आधार घ्यावा लागतो. जर आपल्याला या परिस्थीतीत सुधारणा करायची असेल तर सर्वात अगोदर आपल्याला पर्सनल फायनान्स अर्थात वैयक्तिक वित्त व्यवस्थापन  शिकावे लागेल. वैयक्तिक वित्त व्यवस्थापनामुळे चांगले आयुष्य तर जगता येतेच, पण भविष्यात कुठलीही आर्थिक अडचण आली तर आपण त्याला समर्थपणे तोंड देवू शकतो. 
(Published On 15/02/2020)

News-In-Focus