कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार व्यवसायासाठी 10 लाखांचे कर्ज

कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार व्यवसायासाठी 10 लाखांचे कर्ज

    देशातील गृह आणि लघू उद्योग सुरू करण्यासाठी लागणारे वित्तीय पुर्ण करण्यासाठी भारत सरकारने एप्रिल 2015मध्ये पंतप्रधान मुद्रा योजनेला (पीएमएमवाई) सूरूवात केली होती. हे कर्ज नॉन कॉर्पोरेट लहान व्यवसायासाठी दिले जाते. म्हणून मुद्रा लोन शहरी किंवा ग्रामीण क्षेत्रात स्वतःने किंवा पार्टनरशिपमध्ये लहान यूनिट चालवणाऱ्यापासून दुकानदार, छोटा व्यवसाय/व्यापार असणारे छोटी इंडस्ट्रीज चालवणारे कामगार, खाद्य उत्पादनाशी संबंधीत व्यवसाय करणारे आणि सर्विस सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही योजना आहे. हे कर्ज आपण वाणिज्य बॅंक, ग्रामीण बँक, सहकारी बँक, मायक्रोफायनांस(सूक्ष्म-वित्त) संस्था आणि आर्थिक कंपनीमध्ये अर्ज करून मिळवु शकता. मुद्रा लोन अंतर्गत जास्तीत जास्त 10 लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते.या कर्जला तीन श्रेणीत विभाजित केले आहे. 
    शिशू कर्ज, यात जास्तीत जास्त कर्ज 50 हजार रुपये आहे, किशोर कर्ज, यामध्ये 50 हजारांपासून 5 लाख रूपयांपर्यंत मर्यादा आहे आणि तरुण कर्ज, यात 10 लाख रूपयांची मर्यादा ठेवली आहे. या योजने अंतर्गत कोणाताही व्यक्ती ज्याला व्यवसाय सुरू करायचा आहे. तो कर्ज घेऊ शकतो. यासोबतच जर आपण आपल्या सुरू असल्याला व्यवसायाला आणखी वाढवायचे असेल,तर त्यालाही या योजने अंतर्गत कर्ज मिळू शकते. मुद्रा लोनसाठी त्या सरकारी कार्यालय,बँक किंवा आर्थिक संस्थामध्ये अर्ज करावा लागेल, ज्या मुद्रा लोन देतात. अर्जासोबत आपल्या व्यवसायाची संपुर्ण माहिती प्लॅन आणि इतर आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील. मुद्रा कर्जाची विशेष बाब म्हणजे यात कोणताच निश्चित व्याजदर ठरवलेले नाही. वेगवेगळ्या बँकेत विविध व्याजदराने कर्ज मिळू शकते. व्याजदर व्यवसायावर अवलंबून असेल. तसेच सामान्यतः व्याजदर 12 टक्के असतो. सर्वात आधी अर्जदाराला आपल्या व्यवसायाची योजना तयार करावी लागेल.
(Published On 14/03/2020)

News-In-Focus