क्रूड ऑईल भडकले, दरात मोठी वाढ

क्रूड ऑईल भडकले, दरात मोठी वाढ
    मुंबई (24 जानेवारी) : जागतिक कमाॅडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ८८ डाॅलरवर गेला आहे. तेलाचा वाढत भाव आणि डॉलरसमोर रुपयात होत असलेल्या अवमूल्यनाने तेल कंपन्यांसाठी नवा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी २४ जानेवारी २०२२ रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थे ठेवले. सलग ८२ व्या दिवशी देशातील प्रमुख चार महानगरांत इंधन दर स्थिर आहेत.
    मुंबईत आज सोमवारी एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.४० रुपये आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. 

News-In-Focus