नेटवर्थ ट्रॅक करा, टार्गेट निश्चित ठेवा

नेटवर्थ ट्रॅक करा, टार्गेट निश्चित ठेवा

चांगला गुंतवणूकदार बनण्यासाठी काही गोष्टींवर फोकस करणं महत्त्वाचं असतं. आपले आर्थिक आरोग्य सक्षम होण्यासाठी व्यक्तिगत स्तरावर प्लॅनिंग गरजेचे असते. त्यासाठी चार महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ. नेमके काय केले तर पर्सनल फायनान्सला मदत होईल हे आपण पडताळून पाहू शकतो. 

तुमचे नेटवर्थ ट्रॅक करा 
वैयक्तिकरित्या आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर तुम्ही तुमचे एकूण उत्पन्न, सध्याचे अॅसेट्स आणि देवघेव या व्यवहारांचा ट्रॅक योग्य पद्धतीने ठेवा. आपली देणी काय आहेत, त्याच्या परतफेडीसाठी आपण काय करणार आहे याचा निश्चित आराखडा तुमच्यासमोर असायला हवा. याशिवाय तुमचे टार्गेटही निश्चित असले पाहिजे. घर खरेदी करणे, एखादी कार खरेदी करणे, कुटूंबातील एखादे लग्न अथवा पर्यटन हा सर्व बाबी तुमच्या टार्गेटवर असल्या पाहिजेत. त्यासाठी तुम्ही अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन असे उद्दीष्ट निश्चित करा. मग त्यातून आपण गुंतवणूक किती आणि कशी करायची हे ठरवू शकतो. याशिवाय, आपल्या संपत्तीमधून हमखास रिटर्न मिळतील यासाठी प्लॅनिंग केले पाहिजे. यासाठी गुंतवणुकीतील म्युच्युअल फंड, शेअर, बाँड्स, हेज फंड, ईटीएफ असे पर्याय स्वीकारता येतील. स्मार्ट गुंतवणूकीसाठी प्रयत्न करायला हवेत. 

कर्ज मर्यादीत ठेवा, आपत्कालीन निधी जोडा
चांगली आर्थिक स्थिती असण्यासाठी आपण आपले कर्ज नियंत्रित करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेकजण कर्जात बुडालेले असतात आणि देणी खूप करून बसतात. क्रेडिट कार्डची जीवनशैली अनेकांनी स्वीकारलेली असते. मात्र, क्रेडिट कार्डवर अवलंबून असणे ही चांगली आर्थिक सवय नाही. त्यामुळे त्याविषयी सजग रहा. याशिवाय, आपल्या उत्पन्नातील एखाद्या हिस्सा दरमहा राखून ठेवला पाहिजे. त्यातून आपत्कालीन निधीचे प्लॅनिंग हवे. त्यामुळे जेव्हा आर्थिक अडचणी येतील, अथवा अचानक नोकरी जाणे, आरोग्यसंबंधीच्या समस्या, अपघात अशा आपत्कालीन परिस्थितीत आपण आर्थिक रुपाने सुखरूप राहू शकतो. 

News-In-Focus