फोन-पेच्या व्यवसायात एका वर्षात 5 पटीने वाढ

फोन-पेच्या व्यवसायात एका वर्षात 5 पटीने वाढ
डिजीटल पेमेंट प्लॅटफार्म फोन-पे एपने नोव्हेंबर 2018 मध्ये 100 कोटी ट्रांझॅक्शनचा आकडा पार केला होता. गत वर्षी फोनपेच्या व्यवसायात 5 पटीने वाढ झाल्याचे दिसून येते. कंपनीने नोव्हेंबर 2019 च्या आकडेवारीनुसार 500 कोटी ट्रांझॅक्शनचा आंकडा पार केला आहे. त्यानुसार मागील एका वर्षात कंपनीची ग्रोथ 5 पटीने वाठली आहे. कंपनीने सांगितले की, देशभरातील 80 लाख दुकानदार देवाण-घेवाणीसाठी फोन-पे चा वापर करत आहेत. देशभरात या डिजीटल पेमेंट प्लॅटफॉर्मचे 17.5 कोटी अॅक्टिव्ह युजर्स आहेत. देशातील 215 शहरातील अंदाजे 80 लाख एमएसएमई उद्योगांनी फोन-पेला डिजीटल पेमेंट ऑप्शनम्हणून स्विकारले आहे. तर 56% ट्रांझॅक्शन या वेळेस टियर-2 आणि टियर-3 शहरातून केले जात आहेत.
(Published On 11/04/2020)

Techno Trend